ग्रहाचे सुंदर छायाचित्र आले समोर
नासाच्या जेम्स वेब टेलिस्कोपने युरेनस ग्रहाचे आतापर्यंतचे सर्वात स्पष्ट छायाचित्र काढले आहे. या छायाचित्रात या ग्रहाच्या 13 पैकी 11 कडा दिसून येत आहेत. तसेच त्याच्या 27 चंद्रांपैकी 6 चंद्र देखील दिसत आहेत. हे सध्याच्या काळातील अदभूत छायाचित्र आहे.
यूरेनस ग्रहाचे इतके स्पष्ट छायाचित्र हबल टेलिस्कोपने देखील काढले नव्हते. हे छायाचित्र काढण्याची कहाणी मागील वर्षी सुरू झाली हीत. तेवह नासाने जेडब्ल्यूएसटीच्या मदतीने नेपच्यूनची प्रतिमा जारी केली होती. परंतु यावेळी बर्फाळ ग्रह यूरेनसचे प्राप्त झालेले छायाचित्र खगोलप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. या छयाचित्रात ग्रहाच्या स्पष्ट चित्रासह त्याच्या कडाही दिसून येत आहेत.

बर्फाळ ग्रह यूरेनसचा व्यास 25,362 किलोमीटर इतका आहे. तर पृष्ठभागावरील तापमान उणे 216 अंश सेल्सिअस इतके असते. या ग्रहाला सूर्याला एक प्रदक्षिणा घालण्यासाठी 84 वर्षे लागतात. तर पृथ्वीला केवळ एक वर्ष लागते. सध्या यूरेनसवर स्प्रिंग ऋतू आहे. यूरेनस ग्रहाचे सुंदर छायाचित्र जेडब्ल्यूएसटीच्या वेब नीयर-इन्फ्रारेड कॅमेऱयाद्वारे काढले गेले आहे.
यापूर्वी हबल, वॉयजर-2 आणि केके ऑब्जर्व्हेटरीने यूरेनसचे छायाचित्र काढले होते, यूरेनस ग्रहाभोवती निळय़ा, पांढऱया रंगाच्या कडा असून सूर्याच्या दिशेने असणारा भाग मोत्यांसारखा चमकणारा आहे. यूरेनसच्या ध्रूवांवर वेगळाच चमकदारपणा दिसून येतो.
हबल आणि केके ऑब्जर्व्हेटरीद्वारे वैज्ञानिकांना याचे धूव दिसत नव्हते. या ग्रहाच्या पृष्ठभागावर पाणी, मिथेन आणि अमोनिया वायू आहे. वेबच्या छायाचित्रात यूरेनसच्या 13 पैकी 11 कडा दिसून येत आहेत. जेडब्ल्यूएसटी या दूर्बिणीच्या मदतीने वैज्ञानिक खोल अंतराळाचे अध्ययन करत आहेत. वैज्ञानिक यूरेनस ग्रहाविषयी विस्तृत अध्ययन करणार आहेत.
यूरेनसचे वजन 14 पृथ्वींइतके आहे. या ग्रहावरील वायूमंडळाची कक्षा 27.7 किलोमीटर इतकी असून यात हायड्रोजन, हीलियम, मिथेन हे वायू अधिक प्रमाणात आहेत. यूरेनसच्या चहुबाजूला तयार झालेल्या कडय़ांमध्ये छोटय़ा कणांपासून अनेक मीटर मोठे दगड आहेत.
1986 मध्ये नासाच्या वॉयजर-2 अंतराळयानाने पहिल्यांदा यूरेनसचे छायाचित्र मिळविले होते. यूरेनसच्या पृष्ठभागापासून 81,500 किलोमीटर अंतरावरून हे छायाचित्र काढले होते. यूरेनस हे नाव ग्रीक देवतेवरून पडले आहे. हा ग्रह सौरमंडळातील सर्वात वजनी अन् तिसरा सर्वाधिक व्यास असणारा ग्रह आहे.









