पाण्यातून पोहोचला शरीरात
पृथ्वीवर जीवजंतूंच्या अशा अनेक प्रजाती आहेत, ज्या आमच्या भोवताली आहेत, परंतु त्या आम्ही ओळखू शकत नाही. सर्वसाधारपणे कीडे आपल्याला डोळ्यांनी दिसून येतात, परंतु काही जीव अत्यंत सुक्ष्म असल्याने केवळ डोळ्यांद्वारे ते पाहणे शक्य होत नाही. एक अशाच परजीवी माणसाला दिसून येत नाही, परंतु चुकून तो मानवी शरीरात शिरला तर मृत्यू निश्चित आहे.
शालेय अभ्यासक्रमात अमीबा आणि पॅरामीशियमबद्दल शिकविण्यात येत असते. हा अमीबा शरीरात दाखल झाल्यावर मोठे नुकसान घडवून आणत असतो हे बहुतेकांना माहित असावे. परंतु अमेरिकेतील एका व्यक्तीची कहाणी धक्कादायक आहे. हा व्यक्ती पाण्याद्वारे स्वत:चे नाक साफ करत होता, परंतु या प्रक्रियेत त्याच्या शरीराच्या आत मेंदू फस्त करणारा अमीबा शिरला आणि त्या व्यक्तीचे जीवन संपवूनच शांत झाला.

या व्यक्तीचा मृत्यू नाइग्लेरिया फोवलेरी नावाच्या परजीवीमुळे झाल्याचे फ्लोरिडाच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. सर्वसाधारणपणे याला मेंदू फस्त करणरा अमीबा म्हणून ओळखले जाते. संबंधित व्यक्तीचे नाव जाहीर करण्यात आले नसले तरीही तो टाकीतील पाण्याद्वारे सायनस रिंजिंग प्रोसेस करत होता. यादरम्यान पाण्याद्वारे अमीबा नाकावाटे त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचला. संसर्गामुळे त्याच्या मेंदूला सूज आली आणि नंतर या संसर्गाने त्याचा जीव घेतला आहे.
2012-21 दरम्यान मेंदू फस्त करणाऱ्या अमीबाशी निगडित 31 प्रकरणांची अमेरिकेत नोंद झाली आहे. पाण्याद्वारे हा अमीबा मानवी मेंदूपर्यंत पोहोचतो, डोकेदुखी, उलटी होणे आणि चक्कर येणे यासारखी लक्षणे दिसून येऊ लागतात. 1962 ते 2021 दरम्यान अमेरिकेत अशाप्रकारचे 154 ऊग्ण आढळून आले असून यातील केवळ 4 जणांनाच वाचविता आले आहे.









