City and Industrial Development Corporation News : कोकण मंडळातील पीएमएवाय मधील शिल्लक घरांची विक्रि होणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळातील विरारमधील आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरांची विक्री होत नसल्याने मंडळाची डोकेदुखी वाढली होती. मात्र केंद्र सरकारने मुंबई महानगर प्रदेशातील पीएमएवाय मधील घरांची उत्पन्न मर्यादा वार्षिक 3 लाखांवरून 6 लाख रुपये केली आहे. त्यामुळे आगामी सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणाऱ्या पीएमएवाय मधील घरांची विक्री होईल असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, मे महिन्यात काढलेल्या 4654 घरांच्या सोडतीलमधील पीएमएवायमधील 984 पैकी विक्री न होऊ शकलेल्या 656 घरांचा आगामी सोडतीमध्ये समावेश करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.उलवे नोडमधील खारकोपर आणि बामनडोंगरी रेल्वे परिसरातील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय ‘सिडको’ने घेतला आहे.यासाठी चाचपणी सुरु केली आहे. अर्जदारांच्या मागणीनुसार ही चाचपणी केली जाणार आहे.
दिवाळीच्या मुहुर्तावर सिडकोने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घाटकोपर आणि बामनडोंगरी रेल्वे परिसरात 7849 घरांची योजना जाहीर करून फेब्रुवारी 2023 मध्ये संगणकीय सोडत काढली. परंतु पाच महिने उलटले तरी अर्जदारांना अद्याप इरादापत्र हातात दिलं नाही.त्यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.तसंच सिडकोच्या घरांच्या किमती जादा असण्याची या अर्जदारांची तक्रार आहे.








