वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
यजमान द. आफ्रिका आणि भारत यांच्यात केपटाऊन येथे 3 जानेवारीपासून दुसऱ्या कसोटीला प्रारंभ होत आहे. द. आफ्रिका संघातील वेगवान गोलंदाज गेरार्ल्ड कोझी या कसोटीत प्रकृत्ती नादुरूस्तीमुळे खेळू शकणार नाही, असे क्रिकेट द. आफ्रिकेच्या प्रवक्त्याने सांगितले.
23 वर्षीय कोझीला सेंच्युरियनच्या पहिल्या कसोटीत खेळताना पोटदुखीचा त्रास झाला होता. या सामन्यात तो केवळ 5 षटकांची गोलंदाजी भारताच्या दुसऱ्या डावात केली होती. या दुखापतीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली त्यावेळी ओटी पोटातील स्नायूला सूज येऊन सातत्याने दाह होत असल्याचे आढळून आले. या कारणामुळे कोझी दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. कोझीने पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात 74 धावात 1 गडी बाद केला होता. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने अद्याप कोझीच्या बदली दुसऱ्या खेळाडूची घोषणा केलेली नाही. कर्णधार बहुमाला अशीच पोटदुखी जाणवत होती. दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गारची ही शेवटची आंतरराष्ट्रीय मालिका आहे. दक्षिण आफ्रिकेने सेंच्युरियनची पहिली कसोटी जिंकून आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 गुणतक्त्यात 100 टक्के आघाडी मिळविली आहे.









