
प्रतिनिधी /खानापूर
कोणत्याही उपचाराने मुलाला उतार पडत नाही, हे लक्षात आल्यावर मातेने शेवटी हतबल होऊन येशूख्रिस्ताच्या प्रुसासमोर आपल्या मुलाला नेऊन झोपविले. आता फक्त दैवी चमत्कारानेच मुलगा वाचणार, अशी भावना पालकांची झाली. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना समजावून मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
जोयडा येथील शैलेश कृष्णा सुतरावी या 8 वर्षाच्या मुलाला मेंदूज्वर झाला आहे. त्याची शुद्ध हरपून हालचाल बंद झाली. हुबळी येथे नेऊन मुलावर उपचार सुरू करण्यात आले. परंतु मुलाची अजूनही मृत्युशी झुंज सुरू आहे.
लोक जे सांगतील ते उपाय माता करत असून असेच कोणाच्या तरी सांगण्यावरून तिने आपल्या मुलाला नंदगड येथील येशूख्रिस्ताच्या प्रुसासमोर ठेवले.
तेथे आलेल्या काही लोकांनी त्याचे चित्रण करून सोशल मीडियावर ते व्हायरल केले. त्यानंतर समाजसेवकांनी त्या मुलाला उपचाराची गरज आहे, असे सांगून समजावून फेसबुक प्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, राहुल तुडवेकर यांनी या मातेची भेट घेऊन त्या मुलाला यश हॉस्पिटलमध्ये दाखल केले.









