साऱया जगातच खोटय़ा नोटा छापण्याचा उद्योग काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे करत असतात, हे साऱयांना माहित आहे. प्रतिवर्ष हजारो कोटी रुपयांच्या बनावट नोटा छापल्या जातात. त्या हातोहात खपवल्या जातात आणि अशा नोटा छापणारे लोक मालामाल होतात. ते पकडलेली जातात. पण तो पर्यंत त्यांनी बख्खळ कमाई केलेली असते. न्यू यॉर्कशायर नामक शहरात एका व्यक्तीने घरातच चवक भारतीय रुपयात ज्यांची किंमत 10 कोटी रुपये होईल इतक्या किमतीचे बनावट डॉलर्स छापले. ते त्याने कोणाच्याही न कळत खपविले. पण पोलिसांच्या लक्षात ही बाब आल्याने त्यांनी त्याला अटक केली. तोपर्यंत तो करोडपती झाला होता.
याकामी त्याला त्याच्या मुलाचेही साहाय्य मिळाले होते. म्हणून त्याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी तस्करीचे गुन्हे करणाऱया अंडरवर्ल्डच्या साहाय्याने ही रक्कम खपविली होती. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असून दोघांनाही अनुक्रमे सहा आणि दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा झाली आहे. या बनावट नोटा ज्यांच्या हाती गेल्या त्यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तपास अधिकारी माग काढत काढत या बनावट नोटांच्या स्रोतांपर्यंत पोहचले. पितापुत्राची ही जोडगोळी त्यावेळी पलायन करण्याच्या बेतात होती. पण त्याआधीच त्यांना पकडण्यात आले. त्यांच्यावरील अभियोग सहा महिने चालला. सहा महिन्यांमध्येच त्यांची पाठवणी कारागृहात करण्यात आली.









