सोशल मीडियावर लाइक्सद्वारे करतेय कमाई
छंद कुठल्याही प्रकारचा असू शकतो. अजब छंद असणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. अनेक लोक अजब गोष्टी जमा करत असतात. अनोख्या गोष्टींमध्ये अनेकदा अशा गोष्टी असतात, ज्यांच्याविषयी कळल्यावर धक्काच बसतो. ब्रिटनमील एका महिलेला स्वत:च्या डोक्यावरील केस जमा करून मोजण्याचा छंद आहे. आतापर्यंत तिने 30 हजारांहू अधिक केस जमा केले आहेत आणि प्रत्येक केस मोजून ठेवला आहे.
भिंतींवर टांगलेला संग्रह
लिव रोज स्वत:च्या संग्रहातील केसांना मोजते, हे केस तिने एका हेअर ब्रशमध्ये जमा करत भिंतीवर टांगून ठेवले आहेत. महिलेचे केस 22.5 इंच लांब असून जे आता कंबरेच्या खालीपर्यंत पोहोचले आहेत. तिचा दिनक्रम अत्यंत ठरलेला आहे, तिच्या छंदापोटी मागील 4 वर्षांपासून तिच्या केसांची संख्या 30 हजारांपर्यंत पोहोचली आहे. ही संख्या 1 लाखापर्यंत पोहोचविण्याचा तिचा प्रयत्न आहे.
पूर्ण हिशेब नमूद
लिव केसांच्या मोजणीचा तपशील एका नोटबुकमध्ये नोंदवून ठेवते. याचबरोबर ती स्वत:च्या छंदाच्या प्रवासाला सोशल मीडियावरही शेअर करते. प्रारंभी स्वत:चे केस चांगल्याप्रकारे जमा करण्याची कुठलीच योजना नव्हती. मला केवळ केस सांभाळून ठेवण्याचा छंद होता आणि ते विगमध्ये बदलण्याचा विचार होता असे लिव सांगते.
छंदातून कमाई
आता हाच केस जमा करण्याचा छंद लिवच्या उत्पन्नाचा मार्ग ठरला आहे. कारण तिच्या टिकटॉक व्हिडिओला 3.82 कोटी लाइक्स मिळाल्या आहेत. तर तिचे 4,47,000 फॉलोअर्स झाले आहेत. यात अधिक वेळ लागत नाही तसेच याकरता फारसा खर्च करावा लागत नाही. दररोज सकाळी उठल्यावर केसांना ब्रशने सरळ करते आणि यामुळे ते चांगल्या स्थितीत असल्याचे लिव सांगते. लिव दर दोन आठवड्यांनी एकदा स्वत:च्या केसांना धूत असते आणि मग एक दिवस स्वत:च्या तुटलेल्या केसांचा विचार सोशल मीडियामुळे तिला सूचला होता. तिने एकाला विग तयार करताना पाहिले होते आणि यानंतरच तिने स्वत:चे केस जपून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ब्रशने केस विंचरल्यावर ती त्यातून गुच्छाला बाहेर काढते आणि एक-एक केस वेगळा केल्यावर डबल साइडेड स्टिकी टेपमध्ये लावून त्याला भिंतीवर चिकटवून ठेवते.









