बेंगळूर :
आरसीबीच्या विजयोत्सवावेळी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 चाहत्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली आहे. याआधी सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. मात्र, विरोधी पक्षासह अनेकांनी ही रक्कम कमी असून ती वाढवावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे सरकारने 10 ऐवजी 25 लाख रु. मदत देण्याची घोषणा केली आहे. आरसीबी व्यवस्थापनाकडून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाखांची आणि केएससीएकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत दिली जाणार आहे.









