नवी दिल्ली :
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सुनावणी टळली आहे. पीडितेची प्रकृती बरी नसल्याने ती न्यायालयात पोहोचू शकली नाही. याप्रकरणी राउज अॅव्हेन्यू न्यायालयात पुढील सुनावणी 12 सप्टेंबर रोजी होणार आहे. परंतु मंगळवारच्या सुनावणीसाठी आरोपी बृजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर न्यायालयात उपस्थित होते. बृजभूषण हे माजी खासदार तसेच कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत.









