लोणंद :
लोणंद शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी लोणंद नगरपंचायतीसह एनएचआय, पोलिस यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम, वीज वितरण कंपनी आदी सर्वच शासकीय यंत्रणांनी आक्रमक भूमिका घेतली असून सोमवारी लोणंद–सातारा व लोणंद–शिरवळ रोडवरील अतिक्रमणे मोठ्या पोलिस बंदोबस्तात काढण्यात आली.
यावेळी नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे,चेतन मोरे,मुख्याधिकारी दत्तात्रय सागर मोटे, सागर मोटे, एन एच आयचे भूमी संपादन समन्वयक अधिकारी लक्षमण पाटील टेक्निकल मॅनेजर पंकज प्रसाद लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि सुशील भोसले पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम पोलिस उपनिरीक्षक ज्योति चव्हाण आदि नगरपंचायतचे विजय बनकर दादा खोत वैजनाथ गाडे अमोल जाधव संदिप जाधव रामदास तुपे आदि शासकीय अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शासकीय जागेत अतिक्रमण केलेल्या काही स्टॉल व खोकीधारक, तसेच टपरीवाल्यांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली होती तर राहिलेली अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान हटवण्यात आली.
शहरातील लोणंद–शिरवळ रस्त्यावरील अनेक खोकीधारकांनी दोन दिवस आधीपासूनच आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घेण्यास प्रारंभ केला होता लोणंद शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर ठोस उपाययोजना करण्यासाठी 29 जानेवारीला नगरपंचायतीच्या सभागृहात पदाधिकारी, अधिकारी, पोलिस, सार्वजनिक बांधकाम, एनएचआय, वीज वितरण कंपनी, व्यापारी व नागरिकांच्यात झालेल्या बैठकीत शहरातील लोणंद सातारा रस्ता, लोणंद–शिरवळ रस्ता व लोणंद खंडाळा रस्ता येथे शासकीय जागेत झालेली अतिक्रमणे विशेष मोहीम राबवून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी 11 वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेला मोठ्या पोलिस बंदोबस्तात दोन जेसीबी च्या सहाय्याने सुरुवात करण्यात आली लोणंद–सातारा व लोणंद शिरवळ रोडवरील अतिक्रमणे काढण्यात आली संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ही अतिक्रमण मोहिम चालु होती व राहिलेली अतिक्रमणे मंगळवारी काढण्यात येणार आहेत.
- स्टॉलधारकांचे होणार पुनर्वसन
अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान काढलेल्या स्टॉलधारक व टपरीवाल्यांचे बस स्थानकासमोरच्या व बाजारतळ येथील शासकीय जागेत तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्याचा आणि गणपती मंदिरासमोरच्या जागेत चारचाकी व शांतीकाका सराफ दुकानाच्या पाठीमागील बाजूच्या शासकीय जागेत दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला असून, या मोहिमेस सर्वांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन नगरपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.








