बेळगाव प्रतिनिधी – घरे पडलेल्या कुटुंबांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, नुकसान झालेल्या पिकांचा सर्वे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पाऊल उचला असे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. सर्किट हाऊस येथे बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली. जिल्ह्यामध्ये नुकसान झालेल्या पिकांना तसेच घरांची पडझड याबाबत पालक मंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी ही सूचना केली आहे. सरकारकडे निधी उपलब्ध आहे, त्यामुळे नुकसान झालेल्या व्यक्तीला त्रास होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी पाऊल उचलावे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आतापर्यंत दिलेल्या नुकसान भरपाई संदर्भात माहिती पालकमंत्र्यांना दिली आहे. जिल्ह्यामध्ये किती घरांची पडझड झाली, शेतीचे किती नुकसान झाले याची माहिती देऊन वितरित केलेला निधी त्यांनी सांगितला. त्याचबरोबर इतर समस्यांबाबत देखील चर्चा केली आहे, सर्किट हाऊस येथे झालेल्या बैठकीला जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी.बोरलिंगय्या , जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच.व्ही. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुरगुंडी ,अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महालिंग नंदगावी, प्रांताधिकारी रवींद्र करलिंगन्नावर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









