भारतात टिकटॉकवर बंदी असूनही या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील व्हायरल ट्रेंडने देशात मोठी चर्चा मिळविली आहे. हा एक ट्रेंड सध्या इंटरनेटवर धूमाकूळ घालत आहे. या ट्रेंडचे नाव आहे ‘मास्टरडेटिंग’. हे जाणून घेणे आवश्यक आहे की मास्टरडेटिंगमध्ये दोन लोकांची गरज भासत नाही, तर ही स्वत:लाच डेटवर घेऊन जाण्याची कल्पना आहे. शब्द आता लोकप्रियता प्राप्त करत असून सातत्याने वाढत्या पॉप-कल्चर शब्दांचा हिस्सा ठरत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात लोकांना स्वत:ला मास्टरडेटिंग प्रयोग शेअर करताना पाहिले जाऊ शकते.

लोक महागडे रेस्टॉरंट, बार, म्युझियम किंवा पार्कमध्ये फिरण्याचा आनंद घेत आहेत. हा ट्रेंड स्वत:ला विशेष भेटवस्तूंनी आनंद मिळवून देण्याचा, आत्मनिर्भरतेची भावना निर्माण करण्यापर्यंत फैलावला आहे. मास्टरडेटिंगमागे स्वत:मध्ये डोकावून पाहणे, स्वत:ची देखभाल करणे आणि आत्मविश्वासासह एकांताला सामारे जाण्याचा उद्देश आहे. परंतु यामुळे स्वत:विषयी अधिक जाणून घेता येणार असल्याचे लोकांचे मानणे आहे.
डेटिंग कोच एमी नोबेलने मास्टरडेटिंगला स्वत:बद्दल अधिक प्रेम करणे आणि सेल्फ-कंपेशनचे काम ठरविले आहे. मास्टरडेटिंगमध्ये लोकांना स्वत:च्या इच्छा, गरजा आणि आनंदाच्या पद्धते समजून घेण्यापुरता वेळ मिळतो. हे व्यक्तिगत आनंद शोधण्याचे एक साधन आहे. मास्टरडेटिंग हा काही नवा ट्रेंड नाही. स्वत:सोबत एकट्याने डेटवर जाण्याची संकल्पना काही काळापूर्वीच समोर आली आहे. 2010 मध्ये अर्बन डिक्शनरीने या शब्दासाठी एक व्याखा सादर केली होती, ज्यात या शब्दाचा अर्थ ज्या ठिकाणी लोक स्वत:च्या मित्रांसोबत जातात, त्या ठिकाणी एकट्याने जाणे असा आहे.









