रत्नागिरी :
जिल्हा हौशी अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये रत्नागिरीमधील दामले विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे.
८ वर्षाखालील मुलींमध्ये नेहाली गावखडकरने १०० व ५० मीटर धावणे- प्रथम क्रमांक तर स्टैंडिंग लांब उडी-द्वितीय क्रमांक तसेच मीरा दळवीने १०० मीटर धावणे – द्वितीय तर ५० मीटर धावणे व स्टेडिंग लांब उडीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे. ८ वर्षाखालील मुलांमध्ये समर्थ आखाडे याने १०० व ५० मीटर धावणे, स्टैंडिंग लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. दहा वर्षाखालील मुलांमध्ये १०० मीटर धावणेत आयान तडवी प्रथम तर अदनान शेख-द्वितीय ठरला. ५० मीटर धावणेमध्ये अदनान शेख प्रथम क्रमांक तर श्रेयस जाधवने द्वितीय क्रमांक मिळवला. गोळाफेकमध्ये पार्थ गोरेने द्वितीय क्रमांक पटकावला. दहा वर्षाखालील मुलींमध्ये वल्लरी देवस्थळीने द्वितीय क्रमांक पटकावला. बारा वर्षाखालील मुलांमध्ये ६० मीटर धावणेमध्ये रेहान बनेटी याने तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व विजयी विद्यार्थ्यांना शाळेचे क्रीडा शिक्षक विलास शेंडगे यांचे मार्गदर्शन लामले. तसेच मुख्याध्यापक भगवान मोटे व मुकेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. वरील सर्व विद्यार्थ्यांची पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.








