श्रीशैल व काशी पीठाच्या जगद्गुरूंच्या हस्ते मंदिर समितीचे सत्कार
by बिसलसिद्ध काळे
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथील श्री महादेव मंदिरावर श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य व काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य यांच्या उपस्थितीत कळसारोहणचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमानिमित्त 5 ते 10 नोव्हेंबरदरम्यान दररोज मंदिर परिसरात सायंकाळी 6 ते 7 यावेळेत दीपोत्सव 5 ते 9 ya कालावधीत सायंकाळी 7 ते 9 दरम्यान जिंतूर येथील ष.ब्र. अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी शिवपुराणावर आधारित प्रवचनाचा कार्यक्रम झाला. गायक बसलिंगय्या गवई व तबला वादक सुभाष चौडापूर यांची साथसंगत लाभली. 9 नोव्हेंबर रोजी अय्याचार्य व लिंग दीक्षा व नंदी आणि नवगृह प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
सोमवार, 10 नोव्हेंबर सकाळी 11 वाजता श्री जागृत गणेश मंदिरापासून 551 सुवासिनीं जलकुंभासह सहभागी झाल्या होत्या. यावेळी रथातून श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवचार्य व काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांची मिरवणूक करण्यात आली. या मिरवणुकीत पुरवंतांचा कार्यक्रम पार पडला.
महादेव मंदिरात आल्यानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीत मुख्य कार्यक्रम कळसारोहण करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माळकवठ्याचे ष.ब्र. पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी, जिंतूर येथील ष.ब्र. अमृतेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह संतगण उपस्थित होते. त्यानंतर धर्मसभा होऊन महाप्रसाद वाटप करण्यात आली.
कळसारोहण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले यांचा डॉ. शरणाप्पा वरशेट्टी यांच्याकडून श्रीशैल व काशी पिठाच्या जगदगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी जगद्गुरूंचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीशैल वाले, भाजपचे जिल्हा चिटणीस यतीन शहा, अशोक वाले, माजी उपसभापती संदीप टेळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष महासिद्ध हंडे, राजूर सोसायटीचे सचिव राजशेखर वाले, दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, यांच्यासह समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
आशा ठेवा पण दुराशा नको
देवाधिदेव महादेव हा जगाचा कल्याण करता असून माणसाला अशा जरूर असावेत. पण दुराशा हे माणसाला विनाशाकडे घेऊन जाते. म्हणून माणसाने आहे, त्यामध्ये समाधान मानावेत. सृष्टीनिर्माता भगवंताचा आहे, यासाठी देवाकडे सुबुद्धी देवो अशी मागणी करावेत अशी आशीर्वचनात श्रीशैल पीठाचे डॉ. चन्नसिध्दाराम पंडिताराध्य शिवचार्य यांनी केले.
कार्यक्रमाने भारावून गेलो
औरादसारख्या अध्यात्मिक गावामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन देवाधिदेव महादेव मंदिराचे कळसारोहण
करण्यासाठी आम्ही साक्षीदार ठरलो. माळकवठे मठाचे मठाधीश पंचाक्षरी शिवाचार्य महास्वामीजी यांचे नियोजन अत्यंत उत्कृष्टपणे व नियोजनबद्ध झाले. आगामी काळात सभा मंडप होण्यासाठी पाठपुरावा कराव्यात, अशी इच्छाही काशी पीठाचे डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य यांनी आपल्या आशीर्वाचनात केले
ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार
दक्षिण सोलापूर तालुक्यातील औराद येथे जीर्णोदारच्या माध्यमातून साकारण्यात आला. महादेव मंदिराच्या कळसारोहण कार्यक्रम जगद्गुरूंचे उपस्थितीत करण्यात आला. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन उस्फुर्तपणे साजरा केला. या गावासाठी हाकार्यक्रम ऐतिहासिक साक्षीदार ठरला आहे.








