20 हेक्टर क्षेत्रामध्ये नाचणीचे उत्पादन
उदय सावंत / वाळपई
सत्तरी तालुका हा पूर्णपणे शेतीप्रधान आहे. सत्तरी तालुक्यात अनेक प्रकारच्या लागवडी करण्यात येत असतात. यंदा मात्र सत्तरी तालुक्यातील 20 हेक्टर क्षेत्रामध्ये नाचणीची कणसे डौलतान दिसणार आहेत. या संदर्भाची पूर्वतयारी शेतकी खात्याने सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भाची लागवड करण्यात येणार आहे.
यंदाचे वर्ष हे तृणधान्य म्हणून केंद्र सरकारने घोषित केलेले आहे. यामुळे देशाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तृणधान्य शेतीची लागवड करण्यात येणार आहे. सत्तरी तालुक्यात हाच उद्देश ठेवून नाचणीची शेती करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भाची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झालेली आहे. एकेकाळी सत्तरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाचणीची शेती करण्यात येत होती.कालांतराने ही बंद झाली. आता पुन्हा एकदा नाचणीचे पीक सत्तरी तालुक्यामध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी स्थानिक शेतकी खात्याने शेतकऱ्यांना प्रोत्साहित केलेले आहे. शेतकी खात्यातर्फे अनुदान योजना यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना प्रोत्साहन मिळून 20 हेक्टर क्षेत्रामध्ये या संदर्भाचे शेती करण्यात येणार असल्याची माहिती शेतकी खात्याच्या कार्यालयातून प्राप्त झालेली आहे.
नाचणी हे आरोग्यदायी धान्य आहे. जन्मजात मुलापर्यंत ते ज्येष्ठ नागरिकांना नाचणी धान्य आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र या संदर्भाची शेती सत्तरी तालुक्यात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. रानटी जनावरांचा उपद्रव हा त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे.
शेतकी खात्याने जारी केलेल्या अनेक योजना याच्या माध्यमातून सौर ऊर्जा कुंपण सभोवताली घातल्यास व त्या ठिकाणी नाचणी शेती केल्यास ती चांगल्या प्रकारे किफायतशीर ठरू शकतात. या संदर्भाचा प्रयत्न करून 20 हेक्टर क्षेत्रामध्ये या संदर्भाची लागवड करण्यात येणार असल्याचे शेतकी खात्याने स्पष्ट केलेले आहे. यामध्ये एकूण 20 जण सहभागी झालेले आहेत .प्रत्येकी एक हेक्टर क्षेत्रामध्ये नाचणीची शेती करण्यात येणार आहे.
एकूण प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्याच्या जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये या संदर्भाचे लागवड करण्यात येत होती. खास करून डोंगराळ भागांमध्ये नाचणीचे पीक चांगल्या प्रकारे येते. यामुळे डोंगराळ भागात जमिनीची साफसफाई करून त्या ठिकाणी या संदर्भाची लागवड करण्यात येत होती. मात्र हल्लीच्या काळात रानटी जनावरांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. यामुळे शेतक्रयांना या संदर्भाची अडचण निर्माण होऊ लागल्यामुळे नाचणी करण्याचे प्रकार बंद करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकाकडून मिळालेल्या माहितीनुसार एकेकाळी नाचणी हा सत्तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या दैनंदिन वापरातील महत्त्वाचा घटक होता. सकाळी उठल्यानंतर नाचणीची भाकरी, नाचणीची आमील अशा प्रकारचे पदार्थ करून या भागातील शेतकरी पोटाचे भूक भागवीत होते. यामुळे निरोगी जीवन जगण्याची संधी त्यांना प्राप्त झाली होती. मात्र नाचणी करण्याची शेती पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्या जागी भातशेती अस्तित्वात आली. सध्याच्या काळात भात शेतीबरोबरच नाचणीचे पीकही पूर्णपणे बंद करण्यात आले.
दरम्यान या संदर्भात तालुक्याचे शेतकरी अधिकारी विश्वनाथ गावस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की शेतकी खात्याने यंदा गोव्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नाचणी पीक घेण्याचे ठरविलेले आहे. तालुक्यांमध्ये 20 हेक्टर क्षेत्रामध्ये या संदर्भाचे लागवड करण्याचे निश्चित केलेली आहे. या संदर्भात शेतक्रयांना मार्गदर्शन करण्यात आलेली आहे .नाचणीचे उत्कृष्ट बियाणे त्यांना प्रदान करण्यात आलेली आहे .सध्यातरी तरवा घालण्यात आलेला आहे. पुढील आठ ते दहा दिवसाच्या आत तरवा लागणार लागवड करण्यात येणार असून शेतकी खात्यातर्फे त्यांना सातत्याने मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकी खात्यातर्फे हेक्टरी अनुदान देण्यात येणार असून पुन्हा एकदा सत्तरी तालुका हा नाचणीच्या पिकातून डौलताना आपणास दिसणार असल्याचे गावस यांनी स्पष्ट केलेले आहे.









