वेंगुर्ले /वार्ताहर-
संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधारांना शासनाकडून देण्यांत येणारी पेन्शन हि केवळ एक हजार मिळत आहे. त्यांचे अन्य उत्पन्नाचे साधन नसल्यानेच हि पेन्शन देण्यांत येते. त्यात त्यांचा महिन्याचा खर्च भागत नसल्याने अनेक महिलांकडून महिलां राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडे सदरची पेन्शन वाढवून मिळावी यासाठी मागणी होत आहे. त्यादृष्टीने शासनाशी चर्चाकरून निराधार महिलां व हि पेन्शन योजनेच्या लाभार्थी पेन्शनरना वाढवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचेकडे केली आहे.राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील पक्षाच्या कार्यक्रमावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यींनी आपली हि व्यथा मांडली.
आम्ही इतरांप्रमाणे आंदोलन करू शकत नाही. आम्हाला नेतृत्व नाहि. नेतृlवासाठी खर्च देण्यासाठी आमची मिळकत नाहि. मिळणारी पेन्शन रू. 1000/- यात प्रचंड महागाईमुळे महिन्याचा खर्च भागविणे फार कठीण बनले आहे. आपण सत्तेतील पक्ष आहात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजने अंतर्गत असलेल्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना व श्रावणबाळ योजना या योजने अंतर्गत शासनाकडून सर्व कागद पत्राची पुर्तता करून घेऊन जो लाभ दिला जात आहे. त्यानुसार केवळ रू. 1000 एवढी पेन्शन देण्यांत येते. आता सर्वच वस्तुंचे वाढलेले दर पहाता महिन्याचा सर्व खर्च त्यात भागू शकत नाहीत. त्यामुळे शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थींना देण्यांत येणाऱ्या पेन्शनमध्ये वाढ होण्यासाठी आपण शासनाकडे प्रयत्न करावेत. व त्यांना न्याय द्यावा. अशी मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव सौ. नम्रता कुबल यांनी सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीचे सदस्य नितीन कुबल यांच्या समवेत मुंबई सिल्व्हर ओक येथील बंगल्यावर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.









