कोलकाता :
सरकारने देशांतर्गत पातळीवर उत्पादित करण्यात येणाऱ्या कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी या संदर्भातील घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.
सरकारने कच्च्या तेलावरील विंडफॉल टॅक्स हा नव्याने 8400 रुपये प्रति टन इतका केला आहे. याआधी तो 9600 प्रति टनप्रमाणे आकारण्यात येत होता. सदरचे विंडफॉल टॅक्स कपातीनंतरचे नवेदर हे एक मे पासून अमलात येणार असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. 16 एप्रिलला सरकारने कच्च्या पेट्रोलियमवर विंडफॉल टॅक्स वा कर 9600 रुपये प्रति टन इतका केला. जो यापूर्वी 6800 रुपये इतका होता.









