डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन
सांखळी/ प्रतिनिधी
आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा 2.0 हा केंद्र सरकार चा दुसरा टप्पा असून पहिल्या टप्प्यात सर्व नागरिकांना पायाभूत सुविधा आणि योजना देण्यात सरकार यशस्वी झाले असून, आता दुसऱया टप्प्यात सरकार महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे, असे प्रतिपादन मुख्म?त्री डॉ प्रमोद सावंत यांनी सरकारी माध्यमिक विद्यालय येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केलें .
थॉमस सेवा फाउंडेशन आणि ग्रीन व्हेव एन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स यांच्यातर्फे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा 2.0 अंतर्गत सुर्ला गावात सिड बॉल आणि गायीच्या शेणापासून ग्रीन दिया बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.
या वेळी व्यासपीठावर संचालक शैलेश इंगळे, विजय सक्सेना, सॅवियो राड्रिगीस, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, गटविकास अधिकारी श्रीकांत पेडणेकर, लक्ष्मीकांत सुर्लीकर, मुख्याध्यापक सर्वेश्वर नाईक आदी उपस्थित होते
थॉमस सेवा फाउंडेशन आणि ग्रीन व्हेव एन्व्हायर्नमेंटल सोल्यूशन्स संस्थेचा उद्देश हा आहे की महिलांना स्वबळावर उभी करून त्यांना रोजगार प्राप्ती करून देणे, महिलांना आर्थिकदृष्टया मजबूत करण्याचे काम करते. कार्यशाळेत महिलांनी केलेल्या वस्तू आपण देश विदेशात विकू शकतो असे सावियो रोड्रीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले
प्रत्येक तालुक्मयात आत्मनिर्भर ते साठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत करून जि रुची आवड प्रतिभा असेल त्या स्वरूपात काम करून प्रत्येक घटकाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण होण्यासाठी योगदान देत राज्याला पूर्ण आत्मनिर्भरतेकडे नेण्यास हातभार लावावा असे आवाहन मुख्यमंत्री डॉ सावंत यांनी केलें
या वेळी बिविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली सूत्रसंचालन ज्योती सिनारी यांनी केलें श्रीकांत पेडणेकर यांनी आभार मानले.









