प्रतिनिधी/ बेळगाव
येथील पीडित महिलेला सरकारने 2 एकर 3 गुंठे जमीन मंजूर केली आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी ही माहिती दिली आहे. विशेष प्रकरण म्हणून त्या महिलेला जमीन मंजूर करण्यात आली आहे.
गेल्या रविवारी मुलांच्या प्रेमप्रकरणातून तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या घरावर हल्ला केला होता. या प्रकरणातील पीडित महिलेला सरकारने 5 लाख रुपये भरपाई जाहीर केली होती. त्यापाठोपाठ आता 2 एकर 3 गुंठे जमीनही मंजूर करण्यात आली आहे.
कर्नाटक महर्षी वाल्मिकी अनुसूचित जाती विकास निगमच्यावतीने जमीन मंजूर करण्यात आली आहे. अनुसूचित जाती-जमाती कल्याण, युवा सबलीकरण व क्रीडामंत्री बी. नागेंद्र यांनी विशेष प्रकरण म्हणून तातडीने जमीन मंजूर करण्यासाठी सूचना केली होती. पीडित महिलेची परिस्थिती सुधारण्यासाठी विकास निगमने 2 एकर 3 गुंठे जमीन मंजूर केल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
उच्च न्यायालयाने जारी केले निर्बंध
पीडित महिलेची भेट घेण्यावर उच्च न्यायालयाने काही निर्बंध जारी केले आहेत. शनिवारी यासंबंधी एक आदेश जारी करण्यात आला आहे. पीडित महिलेचे कुटुंबीय, राष्ट्रीय महिला आयोगाचे सदस्य तिची भेट घेऊ शकतात. इतर कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींना त्या महिलेची भेट घ्यायची असेल तर संबंधित महिला व वैद्यकीय अधिकाऱ्यांची लेखी परवानगी घेऊनच भेट घ्यावी लागणार आहे. शनिवारी राष्ट्रीय मानव हक्क आयोगाच्या सदस्यांच्या शिष्टमंडळाने पीडित महिलेची भेट घेऊन या घटनेसंबंधी माहिती घेतानाचा व्हिडिओ खासगी वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर उच्च न्यायालयाने एकंदर प्रकाराबद्दल खेद व्यक्त करत भेटीवर निर्बंध आणले









