करवीर निवासिनीच्या किरणोत्सवाची झाली सुरुवात
कोल्हापूर : रविवारपासून सुरू होणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईच्या किरणोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी तिसऱ्यांदा पाहणी करण्यात आली. स्वच्छ वातावरण आणि ढगांचा अडथळा नसल्यामुळे ५ वाजून ४७ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या खांद्याला स्पर्श केला.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान व खगोलशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांकडून ही पाहणी झाली. शनिवारी महाद्वार रोड कमानीजवळ ५.५ वाजता सूयकिरणे होती. गरुड मंडपाजवळ ५.७बाजता, गणपती मंदिरामागे ५.२३, कासव चौकात ५.२९, पितळी उंबरठ्याजवळ ५.३१, चांदीच्या उंबरठ्याजवळ ५.३५, संगमरवरी पायरीजवळ ५.४० वाजता पोहोचली होती.
तर ५ बाजून ४२ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीचा चरण स्पर्श केला. त्यानंतर ५.४५ वाजता गुडघ्यापर्यंत, ५.४६ वाजता कमरेच्या बर पोहोचली. तर ५ बाजून ४७ मिनिटांनी चाचणीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी सूर्यकिरणे देवीच्या खांद्यापर्यंत पोहोचली. देवीच्या खांद्याला सूर्यकिरणांनी स्पर्श केला. हा किरणोत्साब पाहण्यासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.








