मंत्र्याने सुरू करविले काम
लहान मुलांना देशाकडून फार मोठ्या अपेक्षा नसतात. स्वत:च्या आईवडिलांची साथ आणि खेळण्यासाठी उत्तम जागा त्यांना पुरेशी असते. परंतु अनेक ठिकाणी उत्तम क्रीडामैदाने नसल्याने मुलांना नाईलाजास्त घरातच खेळावे लागते. मलेशियायच पेनांगमध्ये राहणाऱ्या एका मुलीसोबत अशाच प्रकारची समस्या होती. मुलीच्या घरानजीक असलेले क्रीडामैदान उत्तम स्थितीत नव्हते. त्यात अनेक मोठे ख•s पडले होते. यामुळे तिची आई तिला खेळण्यासाठी जाऊ देत नव्हती. अशा स्थितीत या मुलीने एक कल्पना राबविली आहे.
10 वर्षीय जोअन्ना सध्या चर्चेत आहे. मलेशियाच्या पेनांगमध्ये राहणाऱ्या जोअन्नाने पेनांगच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उत्तम क्रीडामैदानाची मागणी केली. मुख्यमंत्री चाउ कोन येऊ यांनी पत्र वाचल्यावर त्वरित मुलीच्या भागातील क्रीडामैदानाचे काम सुरू करविले आहे. मैदानची स्थिती खराब असल्याने आई खेळण्यासाठी जाऊ देत नाही असे जोअन्नाने पत्रात नमूद पेले होते.

जोअन्नाने अत्यंत निरागसपणे मुख्यमंत्र्यांसमोर स्वत:चे म्हणणे मांडले होते. आमच्या भागातील मैदानाची दुरुस्ती करत तेथे मुलांना खेळण्यायोग्य सुंदर उद्यान तयार करू शकता का अशी विचारणा तिने मुख्यमंत्र्यांना केली होती. तिच्या परिसरातील उद्यानात गवत वाढले होते, तसेच तेथे लाइट्स नव्हत्या, यामुळे ते मुलांसाठी धोकादायक ठरले होते. परंतु 10 वर्षीय जोअन्नाचे पत्र प्राप्त झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित उद्यान निर्मितीचा आदेश दिला आहे.
सुरू झाले काम
मुख्यमंत्र्यांना हे पत्र 28 जून रोजी मिळाले होते, यानंतर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत जोअन्नाची भेट घेण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी त्यांनी उद्यानाची दुरुस्ती करविली. मुख्यमंत्र्यांसोबत जोअन्नाने नव्या उद्यानात फेरफटका मारला आहे. यादरम्यान मुख्यमंत्र्यांना जोअन्नाने एक चित्र भेट केले आहे. उद्यानातील तुटलेले झोपाळे बदलण्यात आले आहेत.









