रत्नागिरी :
महामार्गावर एलपीजी गॅसने भरलेल्या टँकरच्या अपघातांची मालिका सुरूच आह़े सोमवारी सकाळी 8 वाजता हातखंबा शाळेजवळ चालकाचे नियंत्रण सुटलेल्या टँकरने रस्त्याच्या बाजूला असलेल्या दोन टपऱ्यांसह चार दुचाकींचा अक्षरश: चुराडा केल़ा या अपघातात टेंपो ट्रॅव्हलरमधून जाणारे प्रवासी आणि एका टपरीतील महिला बालंबाल बचावली. सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत काही काळ रास्ता रोको केल़ा अपघातानंतर टँकर बाजूला करतेवेळी महामार्गावरील वाहतूक तासभर खोळंबली होती.
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा शाळा येथे सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गॅस टँकरच्या अपघाताने संपूर्ण परिसर हादऊन गेल़ा गोव्याच्या दिशेने जाणारा गॅस टँकर (केए 01 एजी 8447) वरील चालक सय्यद अबू तागीर ओलीम (62, तामिळनाडू) याचे नियंत्रण सुटले आणि हा टँकर टेम्पोला ओव्हरटेक करीत भरधाव वेगात थेट महामार्गालगत रस्त्याच्या बाजूला उभ्या असल्या चार दुचाकी व टेंपो ट्रॅव्हलर (एमएच 07 एजे 1134) ला धडकत खाऊच्या टपरीत घुसला. अपघातात टपरीतील एक महिला जखमी झाली असून तिला तातडीने हातखंबा ग्रामीण ऊग्णालयात दाखल करण्यात आले. टँकर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.
- …अन्यथा मोठा अनर्थ घडला असता
हातखंबा येथील अपघातस्थळी शाळा असल्याने लगतच्या टपरीवर मुलांची मोठी गर्दी असत़े पण अपघातावेळी तेथे विद्यार्थी नव्हते. त्यामुळे अनर्थ थोडक्यात टळला. अपघातात टपरीचे मोठे नुकसान झाले असून चार दुचाकी पूर्णत: चिरडल्या गेल्या.
- महामार्गाच्या ठेकेदाराविरुद्ध ग्रामस्थांचा पारा चढला
महामार्गालगत महाविद्यालयापासून ते दर्ग्यापर्यंत उभारण्यात येणाऱ्या नव्या पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. या अपूर्ण कामामुळे वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. मात्र तोही सुरक्षित नाही आणि पुरेसा ऊंदही नाही. या सर्व परिस्थितीमुळे वाहनचालकांना दुहेरी अडचणींचा सामना करावा लागत आह़े मुंबई-गोवा महामार्गाचे काम करताना वाहनचालकांना पर्यायी चांगला रस्ता उपलब्ध कऊन देणे ही ठेकेदाराची जबाबदारी आह़े त्यामुळे जोपर्यंत महामार्गाच्या कामाचा ठेकेदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत गॅस टँकर मार्गस्थ होऊ दिला जाणार नाही, असा पवित्रा घेतला.
- ग्रामस्थांचा रास्ता रोको
हातखंबा शाळेजवळ पुन्हा एकदा टँकर उलटल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतल़ी स्थानिकांनी प्रशासनाविऊद्ध संताप व्यक्त करत रस्त्यावर ठिय्या मांडला. नागरिकांचा रोष इतका तीव्र होता की, त्यांनी अपघातग्रस्त दुसरा गॅस टँकर मार्गावरच रोखून धरला आणि महामार्ग ठप्प केला. जोपर्यंत संबंधित ठेकेदार घटनास्थळी येत नाही, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतल़ी अखेर पोलिसांनी याप्रकरणी मध्यस्थी केल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतल़े
- तीव्र उतारामुळे वारंवार घडताहेत अपघात
मुंबई-गोवा महामार्गाचे काम मागील काही वर्षापासून सुऊ आह़े हातखंबा शाळेजवळून ते दर्गापर्यंत पूल बांधण्याचे काम धिम्या गतीने सुऊ आह़े महामार्गाच्या या कामामुळे हातखंबा ग्रामपंचायतीकडे जाताना एक तीव्र वळणाचा उतार तयार झाला आह़े यामुळे अवजड वाहनांवर नियंत्रण मिळवणे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आह़े आहे. चढावावर वाहने बंद पडतात, तर उतारावर गाड्यांवरील नियंत्रण सुटत़े मात्र प्रशासनाकडून या बाबींकडे कानाडोळा केला जात असल्याने वारंवार अपघात घडत आहेत़, असा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आह़े
- गणेशोत्सवासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी
हातखंबा शाळेजवळ अवघ्या आठ दिवसांत गॅस टँकर उलटण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि दंगा नियंत्रण पथकदेखील घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणल़ी मात्र, गणेशोत्सवासारखा मोठा सण जवळ येत असताना, अशा अपघातप्रवण भागांमध्ये तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात, अन्यथा लोकांचा संयम सुटेल, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.
- गॅस गळती न झाल्याने प्रशासनाने सोडला नि:श्वास
महामार्गावर मागील काही दिवसात सातत्याने एलपीजी गॅस टँकरचे अपघात होत आहेत़ जून महिन्यात निवळी येथे गॅस टँकर उलटल्यानंतर एलपीजीची गळती झाली होत़ी याप्रकाराने नजीकच्या घराला आग लागली होत़ी यामध्ये वाहने जळून खाक झाली होती तर गोठ्यातील गुरे पुरती होरपळली होत़ी तसेच हातखंबा येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या टँकर अपघातात गळती झाली होत़ी यावेळी प्रशासनाने वेळीच उपाययोजना कऊन गळती थांबविण्यात यश आले होत़े सोमवारच्या निवळी व हातखंबा येथील गॅस टँकरच्या अपघातात सुदैवाने गॅस गळती झाली नाह़ी अन्यथा दोन घटनांमुळे प्रशासनाची तारांबळ उडण्याची शक्यता होत़ी
- जिल्हा पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी निवळी व हातखंबा येथे झालेल्या अपघातांच्या ठिकाणी भेट देत संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह पोलीस प्रशासनाला अपघातस्थळीच आवश्यक त्या उपाययोजनांसाठी स्पष्ट आणि तातडीच्या सूचना दिल्या. घटनास्थळी निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे, वाहतुकीची सुरळीत व्यवस्था सुनिश्चित करणे आणि भविष्यातील अपघात टाळण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे निर्देश त्यांनी यंत्रणेला दिले.
- पुलाचे काम होईपर्यंत अवजड वाहतूक थांबवावी
हातखंबा शाळेजवळ घडणाऱ्या अपघातांच्या मालिकांमुळे ग्रामस्थांमधून रोष व्यक्त केला जात आह़े अपघात प्रवणक्षेत्र असतानाही प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत़ वाहनचालकांना याठिकाणी वारंवार जीव गमवावा लागत आह़े महामार्गावरील प्रस्तावित पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष देणे गरजेचे असून तोपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक कऊ नये.
– विलास बोंबले, ग्रामपंचायत सदस्य, हातखंबा)








