न्हावेली / वार्ताहर
आज महत्वाचा पाया असलेले शिक्षण क्षेत्राचा महाराष्ट्र राज्यात बट्ट्याबोळ शिक्षण मंत्र्यांच्या माध्यमातून होताना आज दिसत आहे. मुलांना पुस्तकात वहीचे पान देऊन मोठा घोटाळा निर्माण होताना दिसत आहे. पुस्तकातील एका धड्याला एक पान कस पुरेल याचा अभ्यास शिक्षण मंत्र्यांना नसल्याचा दिसुन येत आहे, ओझं कमी करण्याच्या फक्त वल्गना होताना दिसत आहेत. कारण, वह्या ह्या मुलांना घ्याव्याच लागत आहेत. त्यात कित्येक शाळा अजूनही पुस्तके, गणवेशांपासून वंचित आहेत.
आज शिक्षकांचा मोठा प्रश्न जिल्ह्यात उपस्थित झालेला असताना शिक्षण मंत्री निवृत शिक्षकांची भरती करण्याचा घाट घालत आहेत. शिक्षक निवृत्त का होतो याची जाणीव कदाचित शिक्षण मंत्र्यांना नसणार. जे शिक्षक वयोमानानुसार ज्यांना शिकवणे शक्य नसते , प्रवास शक्य नसतो अश्या शिक्षकांना पुन्हा रुजू करणे योग्य नाही आहे, तरीही, जबरदस्ती त्यांना पुनश्य भरती करणे कितपत योग्य आहे.
त्याव्यतिरिक्त अनेक बी.एड, डि.एड युवक नोकरी अभावी बेरोजगार आहेत त्यांचा का विचार केला जात नाही हा देखील महत्वाचा प्रश्न आज जनतेला भेडसावत आहे . अश्या युवकांना कमी पगार देऊन जरी नोकरी देता आली तरी या युवकांचा बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकतो.पण, याची जाणीव जिल्ह्यातील असुनही शिक्षणमंत्री महोदयांना होताना दिसत नाही आहे.अशा अनेक प्रश्नाबाबत लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न युवासेनेच्या माध्यमातून युवासेना उपजिल्हा प्रमुख सागर सोमकांत नाणोसकर, युवासेना तालुका प्रमुख योगेश नाईक, युवासेना तालुका समन्वयक गुणाजी गावडे, युवासेना उपतालुका प्रमुख सोनू गवस यांनी उपस्थित केले आहेत.









