7-9-2022 ते 13.9.2022 पर्यंत
मुहूर्तावर बोलू काही. . .
एखादे शुभ कार्य करण्याअगोदर आपण गुरुजींकडून त्याचा मुहूर्त काढून घेतो. विवाहाचा मुहूर्त, मुंजीचा मुहूर्त, बारशाचा मुहूर्त इतकेच काय तर आजकाल सिझेरियन, ऑपरेशनचादेखील मुहूर्त काढून घेण्याची पेझ आहे. असे का तर हजारो वर्षांच्या अनुभवावरून आणि संशोधनातून आपल्या शास्त्रकारांनी कोणते काम कोणत्या वेळेला केले तर यशप्राप्तीची शक्मयता जास्त आहे हे सांगितले आहे. पण मुळात मुहूर्त म्हणजे काय याबद्दलचा हा लेख. ‘मैं पल दो पल का शायर हू’ किंवा ‘हर घडी बदल रही है रूप जिंदगी..’ वगैरे गाणी तुम्ही ऐकली असतीलच. यामध्ये पल म्हणजे पळ आणि घडी म्हणजे घटिका! पळ आणि घटिका ही वेळ मोजायची साधने होती किंवा वेळ मोजायचे एकक होते. एक घटिका म्हणजे 24 मिनिटे आणि अशा दोन घटिका मिळून बनतो तो एक मुहूर्त! मग लक्षात घ्या की मुहूर्त म्हणजे कालमापन करण्याचे एक साधन आहे. तुम्ही ऐकले असेल घटिका भरली. . पळे भरली वगैरे. म्हणजे एक मुहूर्त अठ्ठेचाळीस मिनिटे. चोवीस तासांमध्ये 1440 मिनिटे असतात. म्हणजेच 24 तासात 30 मुहूर्त आपल्याला मिळतात. त्यातील काही मुहूर्त शुभ असतात तर काही अशुभ. कोणत्या कामाला कोणता मुहूर्त वापरावा हेही शास्त्रकारांनी सांगून ठेवले आहे. तुम्ही लोकांना बोलताना ऐकले असेल की ‘मी ब्रह्म मुहूर्तावर उठतो’ म्हणजे पहाटे लवकर उठतो असा त्याचा अर्थ आहे का? तर ब्रह्म नावाचा मुहूर्त हा पहाटे असतो. म्हणून तो ब्रह्म मुहूर्त. इतके सोपे आहे हे!!! मागच्या काही ‘खजाना’ मध्ये तुम्हाला योग्य आणि चांगले असलेले नक्षत्र कुठले आणि नुकसान देणारे नक्षत्र कुठले हे सांगितले. मागे मी ‘होरा’बद्दलही लिहिले. बऱयाच लोकांनी याचा फायदा झाल्याचा अभिप्राय दिला. कुठलेही महत्त्वाचे काम करत असताना आपण मुहूर्त कसा आहे किंवा आहे का हे बघतो. माझा सगळा प्रयत्न हा तुमचा तुम्हाला मुहूर्त काढता आला पाहिजे हा आहे. याचबरोबर ज्योतिषातील क्लिष्ट गोष्टी सोप्या करून समजावून सांगण्याचा प्रयत्नदेखील आहे. त्याने काय होईल तुमचे तुम्हाला कळेल की एखादी वेळ योग्य आहे की अयोग्य. आणि योग्य असेल तर कुठल्या कामाला योग्य आहे. याकरता काय लागणार आहे तर एक हिंदू कॅलेंडर ज्यामध्ये प्रत्येक दिवशीचा सूर्योदय आणि नक्षत्र नमूद असावे. इतक्मयाच माहितीवर आपण आपले मुहूर्त काढणार आहोत. मुळात एखादा दिवस मला खूप चांगला गेला. सगळी कामे वेळेवर पूर्ण झाली असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नक्की काय होते? आपण योग्य वेळी काम सुरू केलेले असते. आणि त्यामुळे रिझल्ट चांगला मिळतो. आजही बाळाचे पहिले अन्नप्राशन, कान टोचणे, नामकरण, उपनयन, व्यवसाय सुरू करणे, विवाह, वाहन खरेदी, भूमिपूजन, गृहप्रवेश अशा अनेक गोष्टींना आपण मुहूर्त बघतोच. काही लोक म्हणतील की इमर्जन्सी असेल, डॉक्टरकडे जावे लागले असेल, हॉस्पिटलमध्ये दाखल होणे हे सुद्धा मुहूर्त बघून करावे की काय? नाही. अशा वेळेला परमेश्वराचे नामस्मरण करून ते काम केलेले बरे.
महा उपायः वाईट स्वप्ने पडत असतील, स्वप्नामध्ये साप दिसणे, प्रेत दिसणे असा प्रकार होत असेल तर एक नारळ दत्त मंदिरात श्रीदत्तात्रेयांच्या चरणांना लावून घरी आणावा. सगळय़ांच्या डोक्याला स्पर्श करून झाल्यानंतर त्या नारळाची अष्टगंधाने पूजा करावी. तो नारळ एका वाटीत उभा ठेवावा. त्रास कमी झाल्यानंतर वाहत्या पाण्यात सोडावा.
सोपी वास्तू टीपः वास्तु शांतीपूर्वी राक्षोघ्न याग अवश्य करावा. वर्षातून एकदा तरी घरी उदक शांती करून घ्यावी. घरातील वातावरण निर्मळ राहते. नकारात्मक ऊर्जा घरात टिकत नाही. वास्तू दोष असलेच तर त्याचे परिणाम कमी होतात.
मेष
सणासुदीच्या दिवसांमध्ये तब्येत बिघडू नये याची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही बाबतीत अति होऊ देऊ नका. पैशांच्या बाबतीत भाग्यवान असाल. बाप्पाच्या कृपेने प्रवास घडेल आणि त्यातून फायदाही होईल. कागदोपत्री व्यवहारामध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने आपल्या कामाच्या बाबतीत अत्यंत जागरूक करण्याची गरज आहे.
उपाय ः सफाई कर्मचाऱयांना मिठाई दान द्यावी
वृषभ
बाप्पाच्या आगमनाने उत्साह द्विगुणित होईल. आर्थिक बाबतीमध्ये सगळय़ा बाजूने यशप्राप्तीचे संकेत आहेत. कुटुंबातील वातावरण आल्हाददायक असेल. प्रवास शक्मयतो टाळलेला बरा. सही करताना जपून करावी. उत्साहाच्या भरात धोकादायक गुंतवणूक करण्याच्या मोहात पडू नका. प्रेमसंबंधांमध्ये तणावाची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला वरि÷ांचा जाच संभवतो.
उपाय ःगणेश मंदिरात श्रमदान करावे
मिथुन
तब्येतीची साथ मिळाल्याने आत्मविश्वास द्विगुणित होईल. आर्थिक व्यवहार जपून करण्याची गरज आहे. कुटुंबातील कलह मोठे स्वरूप धारण करू शकतो. मातृतुल्य व्यक्तीशी मतभेद संभवतात. जमिनीचे व्यवहार टाळा. शेअर्समध्ये सध्या गुंतवणूक न केलेली बरी. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनामध्ये ताण-तणाव संभवतो. वाहन जपून चालवा.
उपाय ःगणपतीला हिरवी मिठाई नैवेद्य दाखवावी
कर्क
आरोग्याचा पाया तितकासा मजबूत नसल्याने तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तब्येत नाजूक असेल तर जनसंपर्क टाळावा. अपेक्षा केलेली नसताना येणारी रक्कम थांबल्यामुळे मनस्तापाची शक्मयता आहे. घरातील एखाद्या व्यक्तीशी वाद संभवतो. प्रवासातून नुकसान होण्याची शक्मयता आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून लाभाची संभावना आहे. प्रेमींना अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवनात आनंद असेल.
उपाय ः वस्त्र दान करावे
सिंह
उत्सव काळामध्ये तब्येतीची विशेष काळजी घेतलेली चांगली. आयत्या वेळेला तब्येत बिघडू शकते. आर्थिक बाबतीत सावधान राहण्याची गरज आहे. कुटुंबातील व्यक्तींकडून अपेक्षित साथ न मिळाल्याने मन उदास होऊ शकते. जमिनीच्या व्यवहाराकरता अनुकूल काळ आहे. प्रेम संबंधात दुरावा येऊ शकतो. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे योग आहेत. मित्रांकडून लाभ होईल.
उपाय ः सौभाग्य अलंकार भेट द्यावे
कन्या
जागरण केल्याने किंवा कुपथ्य केल्याने तब्येतीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. पैशांची आवक वाढवण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील त्याचबरोबर इतरांची मदत घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण चांगले रहावे याकरता दक्ष रहा. प्रवास घडेल. हरवलेली कागदपत्रे सापडण्याची शक्यता आहे. जमिनीचे व्यवहार किंवा वाहन खरेदी सध्या नको. गुंतवणुकीतून लाभ होईल.
उपाय ः सार्वजनिक अन्नदानाला मदत करावी
तूळ
काही घटनांमुळे मन विचलित होऊ शकते. व्यवसायाच्या ठिकाणी मनाजोगते काम न झाल्याने निराश होऊ शकता. अनपेक्षितरित्या अडकलेले पैसे मिळू शकतात. कुटुंबातील व्यक्तीवर विनाकारण शंका घेऊ नका. प्रवासाचे योजना सध्या रद्द केलेली बरे. सही करताना सावध रहावे. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात गैरसमज होतील.
उपाय ः गणपतीला शमी पत्र वाहावे.
वृश्चिक
मध्यंतरी तब्येतीचा झालेला त्रास आता कमी होईल. पण कुपथ्य करण्यापासून दूर रहा. आर्थिक बाबतीत यशप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. कामे होतील पण विलंब संभवतो. प्रवासातून धनप्राप्तीचे योग आहेत. भावंडांची साथ मिळेल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायद्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाने सावध रहावे. वैवाहिक जीवनामध्ये आनंद असेल.
उपाय ः पूर्वाभिमुख गणपतीचे दर्शन घ्यावे
धनु
तब्येतीला जपावे लागेल. दुखणी अंगावर काढू नका. पोटाचे विकार त्रास देऊ शकतात. धनप्राप्ती उत्तम राहील. कौटुंबिक सुख चांगले मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल. धोकादायक गुंतवणूक करू नका. प्रेमसंबंधात ताणतणाव असेल. नोकरदार वर्गाला बॉसकडून शाबासकी मिळेल. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद घ्याल.
उपाय ः गणपतीला लाल वस्त्र अर्पण करावे
मकर
मित्र परिवारासोबत आणि कुटुंबीयांसोबत सण साजरा करण्याकरता खर्च कराल पण तो खर्च अनाठाई असू नये याची काळजी घ्या. तब्येत उत्तम असेल.
धनप्राप्तीचे नवीन मार्ग सापडण्याची शक्मयता आहे. प्रवास घडेल. कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळेल. स्थावर मालमत्तेसंबंधी समस्या येऊ शकते. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमसंबंधात यश मिळेल. नोकरी करणाऱयांना प्रमोशन मिळू शकते.
उपायः अत्तर जवळ ठेवावे
कुंभ
आरोग्याच्या समस्या दूर होतील. आर्थिक आवक समाधानकारक असेल. भावंडांशी वाद-विवाद संभवतो. जमिनीच्या व्यवहारामध्ये यशप्राप्ती संभवते. गुंतवणुकीतून समाधानकारक परतावा मिळेल. प्रेमींच्या अपेक्षा पूर्ण होतील. नोकरीमध्ये थोडे त्रासाचे वातावरण वाटू शकते. वैवाहिक जीवनातले मतभेद कमी होतील. मानसन्मानाची प्राप्ती होईल. मित्रांकडून हवी तशी मदत मिळणार नाही.
उपाय ः गणेश मंदिरात तुपाचा दिवा लावा.
मीन
श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टींची गरज सध्या तुम्हाला आहे. कामे पूर्ण होण्याकरता अधीर होऊन चालणार नाही. तब्येत सर्वसाधारण असेल. धन प्राप्तीकरता कष्ट करावे लागतील. कुटुंबातील वातावरण गढूळ होऊ देऊ नका. प्रवासातून फायदा होण्याची शक्मयता आहे. लहान भावंडांची मदत मिळेल. मालमत्तेसंबंधी प्रश्न सुटतील. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा येईल.
उपाय ः काजळ दान करावे.





