तुमचे ग्रह आणि तुमचाच अंदाज भाग 3- चंद्र ग्रह
मागे सांगितल्याप्रमाणे आपली नेहमीची सवय ही असते की, आपण हातचे सोडून पळत्याच्या मागे लागतो. मग करा शांत्या, जप इत्यादी इत्यादी. अगदी सोप्या उपायांची आपल्याला सवय नसते किंवा आपल्याला सांगितले जात नाही हे सत्य आहे. चंद्र आपल्या मनाचे प्रतिनिधित्व करतो. त्याचप्रमाणे जलतत्त्वावरती चंद्राची सत्ता आहे. जे काही लिक्विड आहे म्हणजे तरल आहे त्यामध्ये चंद्र आहे. आपल्या भावना तरल असतात म्हणून भावनांवरती चंद्राचे नियंत्रण असते. माया, ममता, आत्मियता आणि प्रेम याची मूर्तिमंत मूर्ती म्हणजे आई. म्हणूनच चंद्रावरून आईदेखील बघितली जाते. तुम्ही जन्माला आलात तेव्हा चंद्र ज्या राशीत होता ती तुमची जन्मरास. मुहूर्त शास्त्रातसुद्धा चंद्रालाच फार महत्त्व आहे. विवाह जुळवताना चंद्र ज्या नक्षत्रात होता त्या नक्षत्रांवरतीच वधूवरांचे गुण मिलन केले जाते. तुमचा स्वभाव, तुमची वागण्या बोलण्याची पद्धत, तुमच्यात असलेल्या भावना, माणुसकी इत्यादी सर्व चंद्राकडेच असते. चंद्र बिघडल्याचे पहिले लक्षण म्हणजे व्यक्तीच्या हातून पाण्याचा अपव्यय होतो. अंघोळीला पाणी सोडून बादली भरून वाहत असते आणि नंतर कधीतरी ती व्यक्ती अंघोळीला जाते. ज्या घरात ज्या व्यक्तीकडून पाण्याचा अपव्यय होतो, नासाडी होते त्याचा चंद्र खराब आहे असे समजायला हरकत नाही. ज्या व्यक्तींना कायम निराशा वाटते, कोणती ना कोणती भीती वाटते, काहीही कारण नसताना डोळ्यात पाणी येते, या व्यक्ती अति भावनाप्रधान असतात. सिनेमा किंवा मालिका बघताना ज्यांच्या डोळ्यात पाणी येते, आपल्याला कोणीतरी सारखे बघत आहे असे ज्याला वाटते. थोडक्मयात मन कमकुवत असणे हे चंद्र खराब असल्याचे दुसरे लक्षण. ज्यांना वारंवार सर्दी, पडशाचा त्रास होतो, श्वास घेण्यामध्ये ज्यांना त्रास होतो, फुफ्फुसांचे आणि किडनीचे विकार, स्मृतिभ्रंश म्हणजे सहजपणे लक्षात न राहणे, मानसिक आजार जसे डिप्रेशन, उन्माद, हिस्टेरिया, स्क्रीझोफ्रेनिया इत्यादी, हे सगळे बिघडलेल्या चंद्राचेच लक्षण आहे. जलोदर होणे, चिडचिड होणे, अस्थिरता, पाण्यापासून भीती वाटणे हे सुद्धा चंद्रामुळेच होते. पराशरी ज्योतिषाप्रमाणे काही प्रमाणात चंद्र पैशांचादेखील कारक आहे. त्यामुळे कंजूसपणा, अति उधळेपणा, पैशांची तंगी वाटणे हे देखील चंद्राच्या अशुभतेमुळे घडू शकते. यापैकी काही लक्षणे जर तुम्हाला जाणवली तर खालील उपाय निर्धोकपणे करू शकता.
(1) चंद्र पाण्याचा कारक असल्यामुळे चुकूनसुद्धा पाण्याचा अपव्यय होऊ नये याची काळजी घ्यावी. तुमच्या कुंडलीत चंद्र कितीही चांगला असला आणि तुम्ही पाण्याचा अपव्यय करत असाल तर तो खराब होऊ शकतो. त्यामुळे पाणी वाचवा आणि चंद्राला वाचवा!!! (2) चंद्र आईचा कारक असल्यामुळे आईबरोबर असलेले आपले संबंध कायम चांगले ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या मागे जर आईचा आशीर्वाद असेल तर बिघडलेला चंद्रदेखील चांगली फळे देऊ शकतो. (3) चंद्राला अर्ध्य देण्याने आपण चंद्राला मजबूत करू शकतो.
बऱ्याच लोकांना चंद्रालादेखील अर्ध्य देतात हे माहीत नसते. त्याचा विधी असा आहे की, कोणत्याही पौर्णिमेला तुम्ही अर्ध्य द्यायला सुऊवात करू शकता. चांदीच्या वाटीमध्ये पाणी, त्यात थोडे दूध, न तुटलेले अखंड तांदूळ थोडे, सुवासिक पांढरे फूल आणि थोडी साखर घालून चंद्राकडे बघत हे अर्ध्य द्यावे (4) भगवान शंकरांनी चंद्राला आपल्या मस्तकावर स्थान दिले आहे. म्हणून दर सोमवारी शंकरावर जलाभिषेक करणे हा देखील एक रामबाण उपाय आहे. ऊद्राभिषेक करून घेणे हे सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकते.
मेष
तब्येतीच्या दृष्टीने काळजी घेण्याचे आवश्यक आहे. खास करून शुक्रवारनंतर आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात. सणासुदीच्या काळामध्ये काही विशिष्ट घटना घडल्यामुळे कुटुंबामध्ये थोडा कलह संभवतो. पैसा खर्च होण्याची शक्मयता आहे. लहान भावांशी वाद होऊ शकतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत भाग्यवान असाल. गुंतवणुकीच्या दृष्टीने आणि यात्रेच्या दृष्टीने उत्तम काळ आहे.
उपाय – पोवळे जवळ ठेवा
वृषभ
या काळामध्ये आरोग्याच्या तक्रारी त्रास देऊ शकतात. धनप्राप्ती साधारण राहील. छोट्या मोठ्या यात्रा घडतील. प्रॉपर्टीची कामे होतील. मनोरंजनाकडे ओढा असेल. नोकरदारांना सावध राहण्याची गरज आहे. वैवाहिक जीवनात ताण तणाव असेल. वीकेंडनंतर चांगली प्राप्ती असेल.
उपाय- अंघोळीच्या पाण्यात चमचाभर दही घाला
मिथुन
विनाकारण आत्मविश्वासामध्ये कमी येऊ देऊ नका. आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. कुटुंबात थोडेसे गेट-टुगेदर होऊ शकते. प्रेझेंटेशनमध्ये सुधारणा होईल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. गुंतवणूक करत असताना सावध रहावे. कोणाच्याही बोलण्याला फसू नका. वैवाहिक जीवन उत्तम असेल. व्यावसायिकांना फायदा असेल.
उपाय- तुळशीजवळील माती कपाळी लावा
कर्क
तब्येतीचा पाया मजबूत असल्याने उत्साहाने भरपूर असाल. निगेटिव्हिटी कमी होईल. धनप्राप्तीचे चांगले संकेत आहेत. कामाच्या निमित्ताने प्रवास घडू शकतो. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावी. प्रेमसंबंधात वादविवाद होईल. शेअर बाजारापासून दूर रहा. नोकरदार वर्गाला या आठवड्यात चांगला अनुभव येईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
उपाय -औषधांचे दान करावे
सिंह
तब्येतीला नजर लागू देऊ नका आणि बाहेरचे खाणे, पिणे कमी करा. आर्थिक गुंतवणूक करण्याकरता उत्तम कालावधी आहे. किमती वस्तू खरेदी कराल. प्रवासाला जाणे टाळलेले बरे. प्रॉपर्टीच्या कामात काही अडथळे येऊ शकतात. नोकरदार वर्गाला संमिश्र्र अनुभव येतील. वैवाहिक जीवनात तणाव जाणवेल.
उपाय – तांबूस गायीची सेवा करा
कन्या
पूर्वीच्या तब्येतीच्या तक्रारी होत्या त्या कमी झाल्याने बरे वाटेल. मनाला शांती प्राप्त होऊ शकते. घरच्या लोकांमध्ये किरकोळ कारणाने वादविवाद होऊ शकतात. इतरांशी बोलत असताना चुकूनही चेष्टा करू नका, याने वाद वाढू शकतात. प्रॉपर्टीची कामे या आठवड्यातच संपवून घ्या. नोकरदारांना पॉलिटिक्सपासून लांब राहणे बरे असेल.
उपाय – बडीशेप खाऊन बाहेर पडा
तुळ
तब्येत अजूनही पूर्ण सुधारली नाही आहे याची जाणीव या काळात होऊ शकते. पोटाच्या विकारांपासून सावध रहा. धनप्राप्ती कष्टाने होईल. कुटुंबात अकारण वादविवाद संभवतो. वीकेंडला प्रवास घडू शकतो. शेअर बाजारात चुकूनही गुंतवणूक करू नका. नोकरी करणाऱ्यांना पुढच्या आठवड्यात चांगली बातमी कळेल.
उपाय- तुरडाळ दान करा
वृश्चिक
आरोग्य बिघडल्याने मन थोडे उदास असू शकते. एक प्रकारचा कंटाळा आल्यासारखे वाटेल. पुढच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात आर्थिक प्राप्ती चांगली असेल. शनिवार-रविवारी प्रवास कराल. छोट्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरदार वर्गाला कटू अनुभव येऊ शकतात.
उपाय- अशोकाची तीन पाने जवळ ठेवा.
धनु
आरोग्याची चांगली साथ मिळेल. तब्येतीकरता केलेल्या कष्टांना चांगले फळ मिळेल. कुटुंबात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. शक्मय असल्यास प्रवास टाळावा. प्रेम प्रसंगांमध्ये अपमान होण्याची शक्मयता आहे. आपला स्वार्थ नसेल तिथे दुसऱ्याला मदत करायला जाऊ नका. गुंतवणूक शक्मयतो टाळावी. नोकरीत त्रास असेल.
उपाय – गाईला वैरण घालावी
मकर
धनप्राप्ती सर्वसाधारण राहील. कुटुंबातील व्यक्तींची म्हणावी तशी साथ मिळणे थोडे अवघड आहे. प्रॉपर्टीच्या कामांना काही काळ पुढे ढकललेले बरे. शेअर बाजारापासून दूर रहा, धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकरदार वर्गाला प्रमोशनचे किंवा पगारवाढीचे चान्सेस आहेत. वैवाहिक जीवन उत्तम असेल. वाहन जपून चालवा.
उपाय – पिंपळाखाली दिवा लावावा
कुंभ
आरोग्य सांभाळावे लागेल. येणाऱ्या आठवड्यात कुटुंबातील वातावरण सुधारेल, पण तोपर्यंत वजाबाकी होऊन देऊ नका. प्रवासाला जाणे शक्मयतो टाळलेले बरे. प्रॉपर्टी संबंधी काही वाद संभवतात किंवा प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येऊ शकतात. प्रेमसंबंधात दुरावा येईल. नोकरी करणाऱ्यांना कष्टाचा परतावा चांगला मिळेल.
उपाय- देवीला कुंकुमार्चन करावे
मीन
या आठवड्यात तब्येतीच्या थोड्या तक्रारी असतील. पण पुढच्या आठवड्यात कमी होतील. आमदानी अठन्नी आणि खर्चा ऊपय्या असा काहीसा योग होत आहे. गुंतवणुकीतून उत्तम फायदा होऊ शकतो. प्रेमसंबंध आनंदमय असतील. नोकरदार वर्गाला पदोन्नतीची संधी आहे. वैवाहिक जोडीदाराची चांगली साथ मिळेल.
उपाय – केशराचा टिळा लावावा





