8.10.23 ते 14.10.2023 पर्यंत
मेष-
श्र्रम अधिक आणि फायदा कमी, अशी परिस्थिती येऊ शकते. या काळत एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होईल. पैशांच्या बाबतीत सावध रहा. वैवाहिक जोडीदाराला त्रास संभवतो. वडिलांकडून कामात विरोध होईल. लोकांकडे लक्ष न देणे आपल्या हिताचे असेल.
-5 लवंगा जवळ ठेवाव्यात.
वृषभ-
वातावरणातील बदल तुमच्यावर खास असा परिणाम करणार नाही. आर्थिक लाभ होईल. तुमच्या बाबतीत अफवा पसरवण्यात येऊ शकतात. तेव्हा वर्तणूक चांगली ठेवावी. शत्रूवर मात कराल. कामाच्या ठिकाणी डोके शांत ठेवावे.
-आपल्या उंचीइतका लाल दोरा पिंपळाला बांधावा.
मिथुन –
आपल्या कामात पूर्णपणे लक्ष ठेवावे. इतरांच्या भानगडीमध्ये पडल्यास नुकसान होऊ शकते. वातावरणाचा तब्येतीवर जरी परिणाम झाला तरी आपण योग्य ते औषध घेऊन त्यावर मात कराल. साप्ताहिक बजेट थोडेसे ढासळेल. पुण्यसंचय करण्याकडे मन ओढले जाईल.
-दूध दान द्या
कर्क-
कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्मयता आहे, तेव्हा विचारपूर्वक खर्च करावा. महत्त्वाच्या गोष्टींना प्रथम प्राधान्य द्यावे. विविध कार्यामध्ये सहभागी व्हाल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. बाहेरचे खाणे टाळावे, मन मात्र कासावीस होईल. -घरातील सदस्यांइतकी नाणी जल प्रवाह करावी.
सिंह –
तब्येतीकडे दुर्लक्ष करणे, हा तुमचा स्वभाव नाही. पण या काळत तणावामुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. म्हणून स्वत:च स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबामध्ये समाधानकारक वातावरण असेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवास घडण्याची शक्मयता आहे. पण तो टाळावा.
-आंबट, गोड मिठाई दान द्या
कन्या-
मित्राच्या कामासाठी प्रवास घडेल. त्यात तुमचाही फायदाच असेल. तुमची रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. जमिनीच्या कामांमध्ये यश येईल. एकूण समाधानकारक गोष्टी घडतील. जवळच्या व्यक्तीची साथ वेळेवर न मिळाल्याने मन अस्वस्थ होईल.
-वस्त्र दान करावे
तूळ-
भाग्याची पूर्ण साथ मिळेल. तीर्थक्षेत्री भेट देण्याची इच्छा उत्पन्न होऊन ती पूर्ण होईल. मात्र, दगदग कमी करावी. खाण्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे जास्त बरे आहे. दिनचर्येमध्ये थोडा बदल संभवतो. मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते. नको ती खरेदी करू नका.
-औषधे दान द्यावी.
वृश्चिक-
तब्येतीविषयी योग्य तो डॉक्टरी सल्ला घ्यावा. थोडेसे चिंतित असाल. निवांतपणासाठी दुसऱ्या गावी जावे, असे वाटू शकते. व्यावसायिकांना मंदीचा अनुभव येईल. जुगार-सट्टा यापासून दूर राहणे शहाणपणचे ठरेल. व्यावसायिक सल्ल्याकरता एखाद्याची भेट घ्याल.
-वडीलधाऱ्या व्यक्तीला आपल्या हाताने दूध द्यावे.
धनु –
अशा काही घटना घडतील की, त्यामुळे मन खूपच आनंदी असेल. प्रॉपर्टी संबंधित अडकलेली कामे पूर्ण होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. यामुळे दुधात साखर पडल्यासारखे वाटेल. एकूण सर्व काही उत्तम असेल. या काळात वरिष्ठांशी बोलताना मात्र सांभाळून बोला.
-पिंपळाचे पान जवळ ठेवावे.
मकर-
गेल्या काही दिवसात तब्येत बिघडली असल्यामुळे अशक्तपणा जाणवेल. डॉक्टरांनी दिलेले औषध-उपचार वेळेवर करत राहणे फायदेशीर ठरेल. पूर्वी केलेली गुंतवणूक फायदेशीर होईल. त्यामुळे मन मात्र नक्की आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी क्षुल्लक गोष्टींवरून वाद होऊ शकतो.
-धार्मिक पुस्तक भेट द्यावे.
कुंभ-
अधिकारात वाढ व प्रमोशन होण्याची शक्मयता असेल. चांगली बातमी समजेल. वाहन सौख्य उत्तम मिळेल. नवे मित्र होतील आणि त्यांच्याकडून मदत मिळेल. व्यवसायात यश प्राप्ती उत्तम असेल. डोके शांत ठेवावे. घर खर्चात वाढ होण्याची शक्मयता आहे.
– केळीच्या झाडाला नियमित पाणी घालावे.
मीन –
या काळात आशा अपेक्षा आपल्या आवाक्यातील असणे जास्त गरजेचे आहे. तरच त्या पूर्ण होण्याची शक्मयता आहे. घरातील लोकांचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभेल. प्रवास फायदेशीर ठरेल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी योग्य तो वेळ देणे गरजेचे असेल. खर्च कमी करणे आपल्या फायद्याचे आहे.
-सौभाग्य अलंकार भेट द्या.
टॅरो उपाय: कर्जमुक्तीसाठी पंजिरीचा उपाय: साहित्य-दोन किलो गव्हाचे पीठ, अर्धा किलो तूप, एक किलो साखर. तुपामध्ये गव्हाचे पीठ भाजून घ्यावे. त्यात साखर मिसळावी. या पदार्थाला पंजिरी म्हणतात. ही पंजिरी दर शनिवारी मुंग्यांच्या वाऊळाकडे दोन चमचे ठेवावी. आमदनीमध्ये वाढ होते. कर्ज लवकर फिटते.





