भरत गोगवले यांच्या नेतृत्वात विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा शिंदे गटानं घेतला आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, त्यांचा उन्माद असाचं असणार आहे. त्यांनी घुसखोरी केली आहे.
आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. मात्र न्यायालयाचा निर्णय यायची ते वाट पाहणार नाहीत. कारण त्यांना माहित आहे की त्य़ांच्या बाजूने सगळ असणार आहे. ज्यापध्दतीने निवडणूक आयोगाने निकाल दिला.ते पाहता सगळ विकल गेलं आहे. शिंदे गट सुरुवातीपासूनच सांगत होते की त्यांना चिन्ह मिळणार आहे म्हणून. ते याच्याच जीवावर सांगत होते. निवडणूक आयोगान जे-जे मागितले ते सर्व आम्ही पुरवले पण त्यांनी ते ग्राह्य धरलं नाही. याचाचं अर्थ आहे की ते आधीचं ठरवलेलं होत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपली वाटचाल अराजकतेकडे चालली आहे. देशात हुकुमशाही येते की काय अशी अवस्था झालीय. 16 आमदार विधानसभेचे आणि 12 आमदार विधानपरिषदेचे आहेत. शिंदे गटानं विधानसभेच्या अध्यक्षांनी परवानगी दिली का? असा प्रश्न त्यांनी विचारला. यावर आता शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सदा सरवणकर यांची प्रतिक्रिया
शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचा आम्ही ताबा घेतला नाही आम्ही प्रवेश केलाय.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होईल त्याचीच तयारी आम्ही करतोय़. विधीमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयात प्रवेश करण्यासाठी भरत गोगावले यांनी रीतसर परवानगी घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








