प्रतिनिधी /बेळगाव
हंगरगे येथील विठ्ठल-रखुमाई मंदिराचा चौकट उभारणी सोहळा मोठय़ा उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विठ्ठल-रखुमाई मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष कृष्णा हुंदरे हे होते. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येत असल्याने गावात सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
समोरील चौकटीचे पूजन मल्लाप्पा हुंदरे व नेमाजी हुंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. गाभारा चौकटीचे पूजन लक्ष्मण सांगावकर, केशव शहापूरकर, राजू पाटील, परशराम मुतगेकर, नामदेव लोहार, योगेश सांगावकर आदींच्या हस्ते करण्यात आले. उत्तर-दक्षिण चौकटीचे पूजन हिरामणी पाटील, परशराम पाटील, मनोहर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गणहोम पूजन कृष्णा कंग्राळकर, नारायण हुंदरे आदींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून जीर्णोद्धार कमिटीचे उपाध्यक्ष सहदेव सावंत व कमिटीचे सदस्य होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर शिवाजी सुंठकर, मनोज पावशे, एस. एस. चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष शुभम शेळके, दिगंबर पवार, बी. एस. पाटील, ऍड. सुधीर चव्हाण, आर. एम. चौगुले, ऍड. श्याम पाटील, मदन बामणे, भागोजी पाटील, माजी एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाला परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व गावातील प्रति÷ित नागरिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश सावंत यांनी केले. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी व उर्वरित कामासाठी सर्वांनी एकत्र येऊन मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे.









