बेळगाव – कर्नाटकात बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या १० ठिकाणांचा विकास करण्यासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यभरात बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेल्या १० ठिकाणांचे विकास करण्यात येत आहे. यामध्ये बेळगाव आणि हासन येथील ठिकाणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या महिन्यात बेळगावातील पहिल्या विकास प्रकल्पाची पायाभरणी करणार आहेत. असे समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले. “एससीएसपी योजनेअंतर्गत, रु. १३,४८३.७९ कोटी जारी केले गेले आहेत आणि रु. १०,७८३.४७ कोटी वापरले गेले आहेत. शिवाय मंजूर झालेल्या रु. ५ ,१६४.९२ कोटी पैकी ३,३८३ .२५ कोटी वापरण्यात आले आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









