शौर्य चौक ते लक्ष्मी टेकनंतर पोलीस लाईनमधील रस्त्याचे डांबरीकरण : नागरिकांतून समाधान
बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील रस्त्यांचे भाग्य उजळले असून शौर्य चौक ते लक्ष्मी टेक पाठोपाठ आता पोलीस आयुक्तालयाच्या रस्त्याचेही डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. कॅन्टोन्मेंटला केंद्र सरकारकडून विकासकामासाठी निधी मिळत नसल्याने कॅम्प परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. विविध रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असून डांबरीकरण तर दूरच गेल्या काही वर्षापासून दुरस्तीदेखील करण्यात आली नव्हती. त्यामुळे वाहनचालकांना ख•dयातून वाट शोधावी लागत होती. त्यातच हेस्कॉमचे बील थकविण्यात आल्याने पथदीपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट परिसर अंधारात आहे.
निधीअभावी विकासकामापासून वंचित रहावे लागत असल्याने कॅन्टोन्मेंट परिसर महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी जोर धरल्याने हस्तांतराबाबत मॅरेथॉन बैठकांचे सत्र सुरू आहे. पण, अद्यापही यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे हस्तांतराची प्रक्रिया केवळ एक गुऱ्हाळ बनून राहिली आहे. विशेष करून विविध रस्त्यांची दयनीय अवस्था बनली असल्याने रस्त्यांची दुरुस्ती किंवा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी रहिवासी आणि वाहनचालकांतून केली जात होती. बऱ्याच दिवसाच्या मागणीनंतर चार दिवसांपूर्वी शौर्य चौक ते लक्ष्मी टेक दरम्यानच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. पण, त्या पुढचा ख•sमय रस्ता तसाच ठेवण्यात आला आहे. यापाठोपाठ शुक्रवारी पोलीस लाईनमधील सीमोल्लंघन रस्त्याचे (लिंगराज कॉलेज ते पोलीस आयुक्तालय) डांबरीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यावर मोठमोठे ख•s पडले होते. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या पोलीस वाहनांना ख•dयातूनच प्रवास करावा लागत होता. वर्षभरानंतर रस्त्याचे डांबरीकरण केले जात आहे. एकंदरीत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यांचे डांबरीकरण केले जात असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. उर्वरित रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यासह डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.









