मालवण -:
ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील एक त्रैवार्षिक धार्मिक कार्यक्रम रविवार १७ डिसेंबर रोजी होत आहे. यानिमित्त १७ रोजी सिंधुदुर्ग किल्ला बंद ठेवण्यात येणार आहे. तरी पर्यटकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन शिवराजेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सयाजी सकपाळ यांनी केले आहे. गेली साडेतीनशे वर्षे ही त्रैवाषिक धार्मिक विधीची परंपरा सुरू आहे.









