वृत्तसंस्था/ अयोध्या
तपास यंत्रणांच्या दुरुपयोगामुळेच 2024 मध्ये भाजप पराभूत होणार आहे. ईडी, सीबआय, प्राप्तिकर विभागाच्या कारवाईची भीती विरोधी पक्षांच्या नेत्यांना दाखविली जात आहे. तपास यंत्रणांचा होणारा दुरुपयोग पाहता भाजप आता कमजोर होऊ लागल्याचे स्पष्ट आहे. पराभव समोर दिसू लागताच भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचे अस्त्र उपजत असल्याचा दावा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे.
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी काँग्रेस समवेत सर्व पक्ष एकत्र येत आहेत. काँग्रेस देखील प्रादेशिक पक्षांना साथ देणार आहे. जेथे गरज भासेल तेथे चर्चा होईल. बैठकीत ठरणारा फॉर्म्युला सर्व विरोधी पक्षांना मान्य असेल असे अखिलेश म्हणाले. अखिलेश यादव हे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्येचा विकास करण्यास भाजपला अपयश आल्याचा आरोप अखिलेश यांनी केला आहे.









