प्रतिनिधी,गडहिंग्लज
गडहिंग्लज शहराजवळ असणाऱ्या किल्ले सामानगडाच्या डोंगराच्या पायथ्याला गुरूवारी सकाळी आग लागली. आग विझविण्यासाठी गडहिंग्लज नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचा बंब आणि वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहे. नरेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यानजीक डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या शेतातील कचऱ्याचे ढिगाला लावलेली आग वाऱ्याने पुढे सरकत डोंगराला लागली असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आला आहे. बघता-बघता सुमारे 25-30 एकर जंगलातील वनराई जळून खाक झाले. त्यासोबत नव्याने लावण्यात आलेल्या रोपांचे आगीमुळे नुकसान झाले आहे. आग वाढत असल्याने वनविभागाकडून जंगलातील बोअरवेलचे पाणी आणि अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









