फुटपाथ-रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
तिसऱ्या रेल्वेगेटवरील पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र त्याला लागून असलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले नसल्यामुळे त्याठिकाणी ख•dयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डिमार्टजवळ असलेल्या फुटपाथवरील चेंबरवरील झाकण कोसळले आहे. मात्र त्याठिकाणी मोठा पाईप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा परिसर पूर्णपणे धोकादायक बनला आहे. तेव्हा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन तातडीने फुटपाथची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
स्मार्ट सिटीमध्ये बेळगावचा समावेश झाल्यानंतर विविध विकासकामे हाती घेण्यात आली. मात्र बरीच कामे अर्धवट आहेत. तर सध्या झालेल्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्यामुळे पहिल्याच पावसात उघडकीस येत आहे. पुलाची उभारणी करण्यात आली. मात्र त्याला लागून असलेल्या सर्व्हिस रस्त्यावर मोठे ख•s पडले आहेत. त्यामुळे पुलाची उभारणी करून इतर रस्ते खराब करण्यातच धन्यता मानली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी याठिकाणी पाहणी करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. फुटपाथवरील चेंबरचे झाकण खाली पडले आहे. त्याठिकाणी मोठा ख•ा पडला असून प्लास्टिकचा मोठा पाईप टाकण्यात आला आहे. रात्रीच्यावेळी हे धोकादायक असून तातडीने त्या फुटपाथची दुरुस्ती करावी, याचबरोबर रस्त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.