डिब्रूगढ ते पासीघाट असा होता मार्ग : डोर्नियर विमानाची देशातच निर्मिती
डिब्रूगढ / वृत्तसंस्था
भारतात निर्मित डोर्नियर 228 विमानाने मंगळवारी पहिले कमर्शियल उड्डाण केले आहे. स्वदेशी विमान डोर्नियर 228 च्या संचालनाची जबाबदारी अलायन्स एअरकडे देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि किरण रिजिजू यांनी या विमानातून प्रवास केला आहे. सिंधिया यांनी उड्डाणाची काही छायाचित्रे ट्विट देखील केली आहेत.
डोर्नियर विमानांचा वापर आतापर्यंत केवळ सैन्यदलांकडूनच केला जात होता. फेब्रुवारीत या विमानासाठी अलायन्स एअरने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केला होता.
ईशान्येतील राज्यांना वायुमार्गाशी जोडण्यासाठी तसेच वाहतूक सुलक्ष करणे आणि संपर्कव्यवस्था वाढविण्यासाठी डिब्रूगढ आणि पासीघाटदरम्यान या विमानाचे उड्डाण सुरू केले जात आहे. नागरी उड्डाणासाठी निर्मित स्वदेशी विमानाने कमर्शियल उड्डाणाचे संचालन करणारी आमची पहिली कंपनी असल्याचे अलायन्स एअरकडून म्हटले गेले.
डोर्नियर 228 ची वैशिष्टय़े..
– हे विमान एकाचवेळी 17 प्रवाशांना नेऊ शकते.
-पहिले कमर्शियल उड्डाण आसामच्या डिब्रूगढ आणि अरुणाच्या पासीघाट दरम्यान होते.
-डोर्नियर 228 विमान दिवसा आणि रात्रीही उड्डाण करू शकते. -छोटय़ा धावपट्टीवर टेकऑफ आणि लँडिंगची क्षमता









