महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन गटांमधील वाद निवडणुक आयोगाच्या कोर्टात गेल्यावर वादाच्या पहिल्या सुनावणीची तारीख निश्चित झाली आहे. 12 डिसेंबरला निवडणुक आयोगाकडून या वादावर सुनावणी होणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी झाल्यानंतर त्यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात मोठी फुट पडून पक्षात उघड-उघड दोन गट पडले. या दोन गटामध्ये संख्येने प्रबळ असलेल्या शिंदे गटाने ‘आम्हीच खरी शिवसेना पक्ष’ असल्याचा दावा करून पक्षाच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरदेखील दावा केलेला आहे.
यावर निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबर रोजी दोन्ही गटांना पक्षाचे नाव आणि चिन्हावर केल्या जणाऱ्या दाव्याच्या समर्थनार्थ 23 नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. आज 12 डिसेंबर ही सुनावणीची तारीख निश्चित करून आयोगाने दोन्ही गटांना आपले म्हणने किंवा कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ही कागदपत्रे 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आयोगासमोर सादर करावयाची आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








