9 नोव्हेंबरला सांगलीत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत अधिवेशन
सांगली : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन सांगली जिल्ह्यात रविवारी ९ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. या अधिवेशनाचे आयोजन सांगली जिल्हा शिवसेना आणि डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्या पुढाकाराने केले आहे. अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे मुख्य। नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी दिली.
पै. चंद्रहार पाटील म्हणाले, सांगली जिल्ह्यात रविवारी ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत संघटनेचे पहिले अधिवेशन आयोजित केले आहे. अधिवेशनाला शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत आणि खा. डॉ. श्रीकांत शिंदे अधिवेशनाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मंत्री शंभूराज देसाई, मंत्री संजय शिरसाठ, मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह इतर पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
श्रीनाथ केसरी बैलगाडी बैलगाडी आणि श्वान शर्यतीचे आयोजन शेतकरी बळीराजाच्या अत्यंत जिव्हाळ्याची बैलगाडी शर्यत काळाच्या पडद्याआड न जावू देण्याच्या उद्देशाने हा प्रयत्न करीत आहे.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ‘श्री–नाथ केसरी बैलगाडी शर्यत‘ तसेच श्वान शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन फेऱ्यांची जनरल बैलगाडा शर्यत आणि पट्टा पद्धतीची बैलगाडी शर्यत घेण्यात येणार असून, राज्यभरातील नामांकित गाडीधनी तसेच चार ते पाच लाख शेतकरी बा-‘धव यात सहभागी होणार आहेत. या स्पर्धेचा मुख्य हेतू गोवंश संवर्धन व पशुसंवर्धनाचा प्रसार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात गायीला ‘राज्य ‘मातेचा‘ दर्जा देण्याच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयातून प्रेरणा घेऊन हे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
–एकूण बक्षीस :
टायोटा फाच्यूनर– २, महिंद्रा थार–२, ट्रॅक्टर ६ ते ७, मोटार सायकल १५० अ–शी आहेत. त्यामध्ये प्रथम पारितोषिक टोयोटा फॉर्च्यूनर, द्वितीय पारितोषिक महिंद्रा थार, तृतीय, चतुर्थ व पाचवे पारितोषिक ट्रॅक्टर, तर सहावे ते दहा पर्यंत पारितोषिक मोटारसायकल असेल. ओपन जनरल मैदान बैलगाडा शर्यतीसाठीही बक्षिसांची योजना असून, प्रथम पारितोषिक – फॉर्च्यूनर, द्वितीय थार, तृतीय ते पाचवे ट्रॅक्टर, सहा ते सात क्र. पर्यंत मोटार सायकल देण्यात येणार आहेत.









