प्रतिनिधी / बेळगाव
अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीरांची पहिली बॅच मराठा लाईट इन्फंट्री येथे दाखल झाली आहे. दि. 25 ते 29 दरम्यान ही भरती झाली असून 160 अग्निवीरांची शारीरिक, वैद्यकीय व सामान्य परीक्षा घेऊन निवड करण्यात आली आहे. 2 जानेवारीपासून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यांच्या प्रशिक्षणाची तयारी पूर्ण झाली आहे.
गेल्या 254 वर्षांमध्ये इन्फंट्रीने सामान्य नागरिकांचे शूर योद्ध्यांमध्ये परिवर्तन करण्याची परंपरा कायम राखली आहे. निवड झालेल्या अग्निवीरांना दहा आठवड्यांचे प्राथमिक व 21 आठवड्यांचे
अडव्हान्स्ड प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर त्यांना देशातील विविध मराठा बटालियन्समध्ये नियुक्त केले जाईल.









