वार्ताहर /नंदगड
रविवार हा खानापूरच्या आठवडी बाजाराचा दिवस असला तरी सोमवारीसुद्धा येथे बाजार भरत आहे. त्यामुळे दोन्ही दिवस खानापूर बाजारात खरेदी करण्यासाठी अनेक लोक आलेले दिसतात. रविवारी खानापूरच्या बाजारात भाजीपाल्यामध्ये टोमॅटोचा दर प्रतिकिलो 100 ते 120 रु. पर्यंत गेला आहे. रोजच्या वापरातील टोमॅटोचा दर गगनाला भिडल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. त्याला पर्याय म्हणून चिंच व आमसोल वापरत असले तरी टोमॅटोची रोजची सवय लागल्याने दर वाढला तरी आठवड्याला एक किलो टोमॅटो घेणारी गृहिणी अर्धा किलो टोमॅटो तरी घेतच आहे. त्याचबरोबर मसाल्याच्या पदार्थांमध्ये 300 ऊपये किलो दर असलेले जिरे 700 ऊपये प्रतिकिलोपर्यंत गेले आहे. जिऱ्याचाही अचानकपणे वाढलेला दर विचार करण्यासारखा आहे. हा दर पुन्हा वाढेल अशी चिंता व्यापारीवर्ग व्यक्त करत आहेत. किराणा साहित्याचे दर मात्र स्थिर आहेत. पालेभाज्यांचे दरही स्थिर आहेत. बाजारात प्रतिकिलो वांगी 60 रु., बिनिस 120 रु., भेंडी 60 रु., बटाटे 35 रु.,ढब्बू 60 रु., घेवडी 80 रु.,गवार 60 रु., कांदे 25 रु., कारली 60 रु. असा दर आहे.









