सेन्सेक्स 366 तर निफ्टी 115 अंकांनी प्रभावीत : अपोलो टायर 8 टक्क्यांनी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचा निर्देशांक नुकसानीसोबत बंद झाला आहे. दुपारनंतर बाजारात दबाव वाढत गेल्याने बाजार घसरणीसोबत बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 365.53 अंकांनी प्रभावीत होत 0.56 टक्क्यांसोबत निर्देशांक 65,322.65 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 114.80 अंकांच्या घसरणीसोबत निर्देशांक 19,428.30 वर बंद झाला आहे. निफ्टीत आयटी, बँक निफ्टी वाहन व औषध क्षेत्रातील घसरणीसोबत बाजार बंद झाला आहे.
यावेळी इंडियन ओव्हरसीज बँकेचे समभाग हे 14 टक्क्यांनी वधारले तर अपोलो टायरचे समभाग हे 8 टक्क्यांनी नुकसानीत राहिल्याची नोंद केली आहे.यावेळी एमरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 21 पैशांनी घसरुन 82.87 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांची कामगिरी
वधारलेल्या कंपन्यांमध्ये शुक्रवारी इंडियन ओव्हरसीज बँक 13.36, वेल्थ 10.33, जीएमएम फॉडलर 9.67 आणि हिंदुस्थान कॉपर 7.22 टक्क्यांनी वधारले आहेत. यावेळी समभागापैकी 8 समभाग हे वधारले होते. यात एचसीएल टेक, पॉवरग्रिड, टेक महिंद्रा, विप्रो, टाटा मोर्ट्स, इन्फोसिस, टायटन आणि टीसीएस यांचा समावेश आहे.
अन्य कंपन्यांची स्थिती पाहिल्यास प्रमुख घसरणीतील कंपन्यांमध्ये अपोलो टायरचे समभाग हे 8.27 टक्क्यांनी घसरले असून यासह अल्केम लॅब 7.71 टक्के व अशोक लेलँड, व्हीमार्ट, आदित्य बिर्ला फॅशन अॅण्ड रिटेल, आयटीसी यांचे समभाग हे प्रभावीत होत बंद झाले आहेत.
यामध्ये आगामी काळात महागाईचा दर वाढणार असल्याच्या संकेतामुळेही भारतीय बाजारात काळजीचे ढग निर्माण झाल्याचे अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे. यामुळे आगामी काळातही बाजारात दबावाची स्थिती राहणार असल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.









