वृत्तसंस्था / स्टुटगार्ट (जर्मनी)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या स्टुटगार्ट पुरूषांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत एकेरीत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड अँडी मरे तसेच इटलीचा मॅटेव बेरेटेनी यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल.
या स्पर्धेतील शनिवारी झालेल्या एकेरीच्या उपांत्य सामन्यात ब्रिटनच्या अँडी मरेने ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गिओसचा 7-6 (7-5), 6-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. हा उपांत्य सामना 95 मिनिटे चालला होता. दुसऱया उपांत्य सामन्यात इटलीच्या बेरेटेनीने जर्मनीच्या ऑस्कर ओटीचा 7-6 (9-7), 7-6 (7-5) असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. ग्रासकोर्टवरील स्पर्धेत बेरेटेनीने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत चौथ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळविला असून मरेबरोबर त्याचा तिसऱयांदा सामना होत आहे.









