The festival of the village deity Shri.Devi Bharadi Devi of Chowke on 16th November
चौके गावची ग्राम देवता श्री.देवी भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी होणार आहे.या निमित्त सकाळी 8 वाजता श्री.भराडी देवीची पूजा नतंर श्री.भराडी देवीची मानाची योटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.त्या नतंर येणार्या योट्या भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते.यावेळी नवस फेडणे नवस बोलणे त्यानंतर रात्रौ 11-30 वाजता वाजत गाजत श्री.देवी भराडीची पालखी मिरवणूक होते.या पालखी मिरवणूकीमध्ये असंख्य भाविकांचा सहभाग असतो.त्यानतंर रात्रौ चेंदवणकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग (चालक सुधाकर दळवी) होणार आहे.तरी सर्व भाविकांनी या जत्रेला उपस्थित रहावे.असे आवाहन गांवकरी मडंळाने केले आहे.
चौके:वार्ताहर









