आरोग्यमंत्री विश्वजित राणे; सत्तरी ऐतिहासिक वारसा जपणार : पर्ये मतदारसंघाच्या लाभार्थी संमेलनात घोषणा
प्रतिनिधी वाळपई :
सत्तरी तालुक्यातील धार्मिक अधिष्ठानाला विशेष महत्त्व आहे. अनेक गावांमध्ये आजही अनेक देवदेवतांच्या प्रतिष्ठेच्या मूर्ती आहेत. या मूर्तींचा इतिहास अजून पर्यंत तऊण पिढीला माहीत नाही. गजलक्ष्मी ही सत्तरी तालुक्यातील प्रमुख देवता आहे. तालुक्यातील या देवस्थानची ऐतिहासिक माहिती तऊण पिढीपर्यंत जाऊन याचा प्रसार व्हावा यासाठी पुढील वषीपासून गजलक्ष्मीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यातून गावाची ओळख समोर येणार आहेत. याचा विशेष फायदा सत्तरी तालुक्यातील निसर्ग पर्यटन व धार्मिक पर्यटन विकासासाठी होईल, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे.
पर्ये मतदारसंघाचे लाभार्थी संमेलन मोर्ले नुकतेच झाले. यावेळी मंत्री राणे यांनी माहिती गजलक्ष्मी उत्सवासंदर्भात माहिती दिली. त्याच्या नियोजनासाठी समिती नियुक्ती केली जाईल. यामध्ये इतिहास अभ्यासक व तज्ञ मंडळींना समावेश करून गजलक्ष्मीचा उत्सव कशाप्रकारे साजरा व्हावा व तो गोमंतकामध्ये विशेष कसा ठरावा, या संदर्भात चर्चा केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
गजलक्ष्मीचा उत्सव हा म्हादई नदीवर आधारित राहणार आहे. गजलक्ष्मी व म्हादई याची वेगळे असे नाते आहे. या संस्कृतीची ओळख धार्मिक दृष्ट्या व्हावी, असा मानस त्यांनी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्येच्या आमदार डॉ देविया राणे, जि. पं. सदस्य देवयानी गावस, सगुण वाडकर, भाजपचे संघटक विनोद शिंदे, भिंरोडा पंचायत सरपंच उदयसिंग राणे, उपसरपंच मनीषा पिळयेकर, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, उपसरपंच सुमित्रा माईणकर, केरी सरपंच दीक्षा गावस, उपसरपंच भिवा गावस, पर्ये सरपंच रती गावकर, उपसरपंच आत्माराम शेट्यो, होंडा सरपंच शिवदास माडकर, उपसरपंच रेशम गावकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंच राधिका सावंत आदांसह इतरांची उपस्थिती होती.
देशातील जनतेचे राहणीमान सुधारावे. यासाठी आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करणे. यावरच नववर्षाच्या कारगर्दीमध्ये नरेंद्र मोदी यांनी विशेष भर दिला. आज देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना प्राप्त झालेली आहे. सर्वसामान्य घटकांना विकासाच्या मध्यवर्ती प्रवाहामध्ये सामील करून त्यांना आनंदी जीवन जगण्याची प्रक्रिया नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या कारगर्दीमध्ये केली. यामुळे आज जागतिक स्तरावर भारताची अभिमानास्पद प्रतिमा निर्माण झालेली आहे .त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेवर स्थापन व्हावे यासाठी प्रत्येकाने सहयोग देणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले. लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा सत्तरी तालुक्मयातील जनता एक संघ आहे हे सर्वांना दाखवून देऊया. प्रलंबित असलेली कामे त्वरित मार्गे लागतील, असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
मोदींचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवा : शेट तानावडे
भाजपा गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने सर्वांगीण विकासाच्या धरतीवर कोणत्या प्रकारचे धाडसी निर्णय घेतले या संदर्भाची सविस्तरपणे माहिती दिली. सर्वसामान्य घटकाना विकासाच्या मध्यवर्ती प्रवास सामील करून देण्याच्या दृष्टिने वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना अमलांत आणल्या. देशाच्या विकासाला जागतिकस्तरावर चालना मिळाली. डिजिटल क्षेत्रामध्ये क्रांती निर्माण होऊ लागलेली आहे. यामुळे केंद्र सरकारने केलेला या धाडसी निर्णयाच्या अनुषंगाने अशा कार्याचा प्रसार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचावा, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
नरेंद्र मोदी यांनी घेतलेले अनेक धाडसी निर्णय याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. अमेरिकेसारख्या देशांमध्ये भारताच्या राष्ट्रगीताचा आदर करण्यात येत आहे. महिलांच्या विकासावर विशेष भर देण्यात आला. केंद्र सरकारच्या सहकार्याने गोव्यामध्ये गृह आधार, स्वावलंबन योजना याच्या माध्यमातून महिलांच्या विकासाची क्रांती निर्माण होऊ लागलेली आहे. यासाठी प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाच्या मागे खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन आमदार डॉ. देविया राणे यांनी केले.









