निवृत्त सेनाधिकारी पीजेएस पन्नू यांचा अभिप्राय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाल्यास पाकिस्तान भारतावर अणुबाँब टाकेल, ही भीती व्यर्थ आहे, असे मतप्रदर्शन भारताचे वायुदलप्रमुख अमरप्रीत सिंग यांनी केले आहे. पाकिस्तानकडे अणुबाँब आहेत, तसे भारताकडेही आहेत. तथापि, हे बाँब किंवा वॉरहेडस् टाकण्याची यंत्रणा पाकिस्तानकडे नाही. ती भारताकडे मात्र, ती अत्यंत सुसज्ज स्वरुपात आहे, असे मत भारताचे माजी लेफ्टनंट जनरल पीजेए पन्नू यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना केले आहे.
पाकिस्तान भारतावर अणुबाँब का टाकू शकत नाही, याची कारणमीमांसाही त्यांनी केली. पाकिस्तानकडे अणुबाँब किंवा अण्वस्त्रे आहेत, ही बाब स्पष्ट आहे. भारताकडेही मोठ्या प्रमाणात अण्विक वॉरहेडस् आहेत. तथापि, भारताकडे ही वॉरहेडस् शत्रूवर त्वरित टाकण्याइतकी प्रबळ यंत्रणा आहे. भारत भूमीवरुन, सागरातून आणि हवेतूनही अण्वस्त्रे त्वरेने डागू शकतो. याचा अर्थ भारताकडहे ‘सेकंड स्ट्राईक, थर्ड स्ट्राईक अशी व्यवस्था आहे. पाकिस्तानजवळ ही यंत्रणा नसल्याने त्याला अणुबाँब आपल्या बंकरमधून बाहेर काढावा लागेल. त्यानंतर तो विमानावर चढवावा लागेल. एवढे करेपर्यंत तो बाँब नेमका कोठे आहे, हे आपल्या रडार यंत्रणांना समजून येईल आणि तो बाँब पाकिस्तान टाकू शकणार नाही, अशी व्यवस्था करता येईल. भारताचे धोरण प्रथम अणुबाँबचा उपयोग करण्याचे नसले, तरी आपल्यावर अणुबाँब पडण्याची स्थिती तो येऊ देणार नाही. त्यामुळे यासंदर्भात पाकिस्तानपेक्षा आपण वरचढ आहोत, असे पन्नू यांनी स्पष्ट केले.
वाऱ्याच्या दिशेचाही परिणाम
सध्या वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत आहेत. त्यामुळे पाकिस्ताच्या अणुबाँबपासून निघणारा किरणोत्सर्ग पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि त्यानंतर युरोपपर्यंत पोहचेल आणि तेथे सर्वाधिक हानी होईल. याची पाकिस्तानला जाणीव असल्याने त्याला अणुबाँबचा उपयोग करण्याचे धाडस होणार नाही. परिणामी अणुबाँबची भीती अनाठाई आहे, असे प्रतिपादन पीजेएस पन्नू यांनी केले आहे.









