सावंतवाडी –
आपल्या मुलाच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून वडिलांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याची घटना आज सावंतवाडी शहरात घडली. सावियो संभया (४८) असे त्यांचे नाव आहे. दरम्यान, मुलगा क्रिश संभया (१८) याचा मंगळवारी कारिवडे येथील धरणात बुडून मृत्यू झाला होता. याचाच धसका वडिलांनी घेतल्याने त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . परंतु उपचारादरम्यान दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली . या दुर्दैवी घटनेने साऱ्यांचे मन हेलावून टाकले असून त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे .









