कोल्हापूर प्रतिनिधी
खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथील एका शेतकऱ्याला गवारेड्याने धडक देवून गंभीर जखमी केले होते. बळवंत सखाराम शेटके (वय 50) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या नातेवाईकांनी उपचारासाठी त्वरीत सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्या शेतकऱ्याचा गुरूवारी सकाळी मृत्यु झाला. या घटनेने खिंडी व्हरवडे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बळवंत शेटके बुधवारी सकाळी गावालगतच्या शेतामध्ये जनावराच्या चाऱ्यासाठी गवत कापण्यासाठी गेले होते. गवत कापून गवताचा भारा डोक्यावरून घेवून गावाकडे येत होते. याचवेळी लगतच्या शेतवडीमधून आलेल्या गवारेड्याने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी होवून शेतामध्ये बेशुध्द होवून पडले. हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना समजताच, त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी शेटके उपचारासाठी त्वरीत सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल केले आहे. त्यंच्यावर सीपीआरमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान गुऊवारी सकाळी बळवंत शेटके या शेतकऱ्यांचा मृत्यु झाला.