सुलधाळ-घटप्रभा मार्गावर चाचणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जात आहे. यातील एक भाग असणाऱ्या सुलधाळ-घटप्रभा या रेल्वेमार्गावर शुक्रवारी चाचणी घेण्यात आली. नव्याने तयार करण्यात आलेल्या रेल्वेमार्गावरून ताशी 120 वेगाने एक्स्प्रेसची चाचणी घेण्यात आली. त्यामुळे भविष्यात रेल्वेच्या गतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वेची गती वाढविण्यासाठी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण करण्यात येत आहे. मिरज ते लोंढा या दरम्यानच्या मार्गावरील सुलधाळ ते घटप्रभा दरम्यान दुपदरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले. 30 कि.मी. रेल्वेमार्गाची शुक्रवारी रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत चाचणी घेण्यात आली. वाऱ्याच्या वेगाने एक्स्प्रेस या मार्गावरून नेण्यात आली. चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता यापुढे एक्स्प्रेस वेगाने धावणाचा मार्ग मोकळा झाला आहे.









