कोणत्याही नैसर्गिक सुगंध हा मनाला प्रसन्न करतो, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे अत्तरे विकत घेतली जातात. आपल्या घराच्या खोल्यांमध्येही ‘रुम प्रेशनर्स’ लावतो, जेणेकरुन सातत्याने सुगंधाचा प्रत्यय येत राहील. असा असा हा सुगंध आपल्याला ‘स्वर्गवास’ही घडवू शकतो, अशी एक घटना नुकतीच घडली आहे.
कॅनडामध्ये काम करणारी एक परिचारिका ज्युलिया इव्हान्स हिने या संदर्भातील तिचा अनुभव कथन केला आहे. या अनुभूतीमुळे तिचे सारे जीवनच पालटून गेले, असे तिचे म्हणणे आहे. ही घटना 2018 मधील आहे. इव्हान्स यांना फुलाच्या सुगंधाची अॅलर्जी आहे. विशेषत: लिली या फुलाशी त्यांचे अगदीच वाकडे आहे. 2018 मध्ये त्यांनी एकदा न कळत या फुलाचा वास घेतला आणि त्यांची गंभीर प्रतिक्रिया निर्माण झाली. त्या बेशुद्धावस्थेत गेल्या. त्यांच्या हृदयविकाराचा झटका आला. परिणामी, लौकिक अर्थाने ‘स्वर्गवासी’ होण्याची वेळ त्यांच्यावर आली. काही काळ त्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. त्यांच्यावर उपचार केले जात होते. पण डॉक्टरांना त्या जिवंत राहतील अशी शाश्वती नव्हती. त्या जवळजवळ मृतावस्थेत गेल्या होत्या. पण काही वेळानंतर आश्चर्यकारकरित्या त्यांची हालचाल होऊ लागली. तसेच त्यांच्या हृदयाचे ठोकेही पुन्हा पडू लागले. कालांतराने त्या चेतनाशून्य अवस्थेतून शुद्धीवर आल्या. याचवेळी आणखी एक चमत्कृतीपूर्ण घटना घडली. त्यांच्या चेनताशून्य अवस्थेतील अनुभव त्यांना आठवू लागले.
त्यांच्या म्हणण्यानुसार या काळात त्या एका रंगीबेरंगी विश्वात पोहचल्या होत्या. स्वर्ग म्हणतात तो हाच असे त्यांना वाटून गेले. त्यांना त्या विश्वात केवळ प्रेम आणि शांती यांचाच प्रत्यय आला. त्यांना आपल्या दिवंगत आईचा स्वर ऐकू आला. मी इथे सुखात आहे, असे त्यांच्या मातेने त्यांना म्हटल्याचे त्यांना ऐकू आले. त्यांचा काही वर्षांपूर्वी आत्महत्या केलेला सर्वात जवळचा मित्र त्यांना भेटला. सावत्र आईच्या मृत्यूचा पुन्हा अनुभव आला. त्यांनी हे सर्व अद्भूत अनुभव प्रसारित केले आहेत. स्वर्ग, नरक या केवळ कल्पना आहेत, असे विज्ञानाचे म्हणणे असते. तथापि, इव्हान्स यांना आलेले अनुभव आपल्याला कोड्यात टाकतात. काय खरे, काय खोटे ते समजेनासे होते. तथापि, या अभूतपूर्व अनुभवाने ज्युलिया इव्हान्स यांचे सारे जीवनच पालटले आहे. अधिक आनंददायक झाले आहे.









