नवी दिल्ली
हवाई क्षेत्रातील कंपनी विस्तारा तिसऱया तिमाहीत पहिल्यांदाच नफ्यात आली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अलीकडेच या कंपनीचे एअरइंडियाने अधिग्रहण केले आहे. डिसेंबर 2022 अखेरच्या तिमाहीत विस्ताराने 1 अब्ज डॉलर्सचा महसुल प्राप्त केला आहे. या कंपनीकडे सध्याला 52 विमाने ताफ्यात आहेत. टाटा सन्स व सिंगापूर एअरलाइन्स यांच्या संयुक्त भागीदारीतून 2015 मध्ये विस्ताराची सुरुवात झाली होती. महिन्याला जवळपास 8500 विमानांच्या फेऱया होत असल्याचे सांगितले जाते.









