ऑनलाईन टीम / तरुण भारत :
‘मदरसा’ या शब्दाचं अस्तित्व आता संपुष्टात यायला हवं. मदरशांमध्ये जाऊन मुलं मोठी होणार नाहीत. मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ होण्यासाठी अभ्यास करायला हवा. त्यासाठी देशात एकसमान शिक्षणपद्धत असणेही आवश्यक आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Assam cm Himanta Biswa Sarma) यांनी म्हटले आहे.
दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत सरमा बोलत होते. ते म्हणाले, मदशांमध्ये शिकून मुलं डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ होणार नाहीत. मुलांनी विज्ञान, गणित, इंग्रजी यासारख्या विषयांवर भर दिला पाहिजे. धार्मिक विषय घरांमध्येही शिकवले जाऊ शकतात. त्यासाठी देशात एकच शिक्षणपद्धत असावी. मुलांना त्यांच्या मानवाधिकाराचे उल्लंघन करून मदरशांमध्ये पाठवले जाते, असा आरोपही शर्मा यांनी यावेळी केला.









